कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
Satara News Team
- Sat 14th Jun 2025 10:11 am
- बातमी शेयर करा
कराड : गुजरात अहमदाबाद मध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. त्यात तब्बल २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रवासात कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी हिचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या विमान अपघातात कराडची कन्या गमावल्यामुळे कराडकरांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील सोमवार पेठ भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्य करतात. त्यांची इंजिनिअर असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील उद्योजक गौरवकुमार ब्रह्मभट याचे बरोबर झाला होता. ते दोघेही अहमदाबाद मध्ये राहत होते.अहमदाबाद ते लंडन प्रवासासाठी याच विमानात ते बसले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला . ब्रह्मभट दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलांना घेऊन ते दरवर्षी कराडला येत असत. यावर्षी एप्रिल महिन्यात ते कराडला आले होते. आता मुलांना केवळ गौरव यांच्या आई-वडिलांचा आधार असल्याचे सुधीर ढवळेकर या त्यांच्या नातेवाईकांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही बातमी कराड शहरात पसरली. त्यामुळे कराडची एक कन्या गमावलीची हळहळ कराडकरांच्यातून व्यक्त होत आहे.
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र या प्रवासात दरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांना घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sat 14th Jun 2025 10:11 am
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sat 14th Jun 2025 10:11 am
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sat 14th Jun 2025 10:11 am
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sat 14th Jun 2025 10:11 am
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Sat 14th Jun 2025 10:11 am
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 14th Jun 2025 10:11 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sat 14th Jun 2025 10:11 am
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Sat 14th Jun 2025 10:11 am













