फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा

फलटण : फलटण येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण मोठ्या उत्साह साजरा केला जातो. पण दरवर्षी पतंग उडवण्याच्या खेळामध्ये वापरला जाणारा जीवघेणा चायनीज मांजाने दुर्दैवी घटना या अगोदरही घडल्या आहेत. फलटण येथे सकाळपासूनच पतंग उडवण्यास मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आणि फलटण येथील मलठण येथे राहणारे पांडुरंग रामचंद्र कुंभार हे आपल्या दुचाकीवरून जात असताना चायनीज मांजाने त्यांचा गळा कापला गेला व तब्बल 18 टाके पडून ते जखमी झाले. नागरिकांनी त्वरित लक्ष्मीनगर येथील डॉक्टर रवींद्र बिचुकले यांच्या स्वामी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्यांच्या जीवितस हानी पोहोचू दिली नाही. 

 फलटण येथे मागील महिन्यापासूनच पर्यावरण वन्यप्रेमी संघटनांनी पत्रकार बंधूनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच येथील वकील संघटनांनी आणि फलटण नगर परिषदेच्या वतीने ही रॅली काढून व पोलीस प्रशासनाने करडी नजर ठेवून सुद्धा चायनीज मांजाची बंदी असताना सुद्धा विक्री होऊन चायना मांजा पतंग उडवण्याच्या खेळासाठी नागरिकांकडून खुलेआम वापरला जात आहे. चायना मांजाची विक्री करणे अथवा वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत असून सुद्धा आणि जनजागृती करून सुद्धा तसेच पोलिसांचे भरारी पथक कार्यरत असताना सुद्धा चायना मांजाचा वापर आणि खुलेआम विक्री मात्र फलटणमध्ये चालू असल्याने यावर पोलीस प्रशासन नियंत्रण ठेवू शकले नाही. यामुळे फलटण शहरातील नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त करण्यात असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जाहीर निषेधच्या भावना सोशल मीडियाच्या द्वारे व्यक्त होत आहेत.

 वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई केल्यास चायना मांजाची विक्री नक्कीच बंद होऊ शकते, असे फलटण शहरातील सर्व सामान्य नागरिक आपले मत व्यक्त करीत आहेत. सकाळीच या पहिल्या घटनेपासून सुरुवात झाली. दुर्दैवाने अजून किती घटना घडू शकतील असेही कोणी सांगू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चायना मांजावर निर्बंध घालणं गरजेचे आहे. अन्यथा अजूनही अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना इतर नागरिकांसोबत घडू शकतात संध्याकाळच्या वेळेस बहुसंख्य महिलावर्ग दुचाकीवर लहान मुलांना घेऊन पण देवदर्शनासाठी जात असतो अशावेळी अशा घटना घडून तात्काळ पोलिसांनी निर्बंध घालावा अशी तीव्र भावना नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला