कोरेगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी जनतेतून उठाव - आ. शशिकांत शिंदे

संगमनगर येथील मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; महेश शिंदे यांना धक्का

सातारा : दारूच्या धंद्यात लागणारे अल्कोहोल तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या कोरेगावच्या आमदारांनी मतदारसंघात पैसा, दहशत व प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून उन्माद चालू केला आहे. यापूर्वी या मतदारसंघात असे कधीही चित्र नव्हते. त्यांचा जनतेला दाखविण्याचा चेहरा वेगळा असून त्यांनी राजकारणाचा धंदा केला आहे. याला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांवर दडपशाही केली जात असून यापुढे एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला दरम्यान कोरेगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी जनतेतून उठाव सुरू झाला आहे .  

त्यामुळे हजारो कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करीत आहेत.असे प्रतिसाद आ. शशिकांत शिंदे यांनी केले. खेड, वनवासवाडी जिल्हा परिषद गटातील मतदार व कार्यकर्त्यांचा संगमनगर येथील स्वराज मंगल कार्यालय संवाद मेळावा व जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पालकमंत्री असताना मी या भागात मेडिकल कॉलेज व येथील जागा संपादन करण्यासाठी पाठपुरावा केला .   

आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. परंतु विरोधकांनी मेडिकल कॉलेज मधील ठेकेदारी मिळवण्यासाठी सातत्याने काम बंद पाडले. येथील लाखो रूपयांच्या भंगार चोरीसाठी कोणाचे पाठबळ मिळाले हे आता जनतेला सांगावे लागणार आहे. त्यांनी मतांसाठी कृष्णानगर येथील व्यापाऱ्यांना जागा देऊन पुनर्वसन करण्याचा खोटा शब्द दिला. हे मतदारांनी चांगले ओळखले आहे. मी येथील काही एकर जागा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व स्थानिक व्यापारी, बेरोजगार युवकां मिळण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आमचे सरकार नसल्याने ते होऊ शकले नाही. असे सांगून आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सद्या या मतदारसंघात वाईट संस्कृती येऊ घातली आहे. काॅक्रीटीकरणाच्या कामात कोट्यवधी रूपयांची टक्केवारी लाटली असून त्यांच्यांच आर.एम. सी.प्लॅन्ट मधून सिरॅमिक्स घेण्याचा हुकूम दिला जात आहे. 

यांची काॅक्रीटीकरणाच्या सर्व कामात भागिदारी आहे. असे सांगून ते म्हणाले, अनेक बेरोजगार ठेकेदाराना त्यांनी केवळ राजकारणासाठी वापरले आहे.मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवली जात असताना मतदारांनी त्यांचा डाव ओळखला असल्यानेच आता त्यांचे हजारो कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. जो नेत्यांचा, पक्षाचा झाला नाही तो जनतेचा कसा होणार असा टोला लगावून आ. शशिकांत शिंदे यांनी खेड ग्रामपंचायतीमध्ये सद्या चाललेल्या भ्रष्टाचारी कारभारावर आसूड उगवला. ते पुढे म्हणाले, सद्या कोरेगाव मतदारसंघात हवा बदलत चालली आहे. राज्यातील महायुती काळातील भ्रष्टाचार, दडपशाही, फोडाफोडी, महागाई , बेरोजगारी या वर मात करण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीला साथ देत क्रांतीचे पाऊल उचलले आहे. [आ. महेश शिंदे यांना धक्का... या मेळाव्यात भाजपच्या पंचायत समितीच्या माजी सदस्या रंजना जाधव, क्षेत्रमाहुलीच्या सरपंच नुतन सावंत, उपसरपंच सत्यवान जाधव यांच्यासह खेड, प्रतापसिंहनगर, क्षेत्र माहुली सोनगाव स. निंब येथील ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, व हजारो युवक कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. 

या प्रवेशामुळे आ. महेश शिंदे गटाला जोरदार धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. ] [ खा.उदयनराजे व माझे वाद नाहीत. या मेळाव्यात बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आमच्या पक्षात असताना त्यांना निवडून आणण्यासाठी मी पायाला भिंगरी लावून काम केले, मदत केली आहे हे येथील मतदारांना माहीत आहे. मी कोणत्याही आव्हानाला घाबरणारा कार्यकर्ता नाही. मी पक्षासाठी लढतो त्यांचे व माझे कोणतेही वैयक्तिक मतभेद किंवा वाद नाहीत. असे ही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले] या मेळाव्यास जि.प. चे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतिश चव्हाण, माजी उपसभापती साहेबराव जाधव, माजी सरपंच हरिभाऊ लोखंडे, युवा नेते संतोष भाऊ जाधव, कामेश कांबळे, संदिप दादा मोझर,प्रकाश जाधव,अंजली निकम, विरसिगं जाधव, अश्विनी कदम, विजय शिंदे, सुरेश कदम, सुनिल शिंदे नंदकुमार शिंदे, कल्याण शिंदे यांच्यासह क्षेत्रमाहुली, सोनगाव स.निंब, खेड, प्रतापसिंहनगर, संगमनगर , विकासनगर, संगममाहुली, महागाव येथील ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त