पोलिसांची साताऱ्यातील 3 जुगार अड्ड्यांवर छापा
Satara News Team
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शाहूपुरी पोलिसांच्यावतीने तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकत सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्केट संकुल परिसर, राजधानी टॉवर परिसर आणि करंजेतील श्रीपतराव शाळा परिसर या तीन ठिकाणी पोलिसांनी नुकतीच कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी शहरातील जुना मोटर स्टॅन्ड येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज मार्केट संकुलाच्या शेजारी सादिक आयुब सय्यद रा. गुरुवार पेठ, परज, सातारा आणि चंद्रमणी आगाणे (रा. गोडोली, सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून १ हजार ५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत राजधानी टॉवरच्या आडोशाला मधुकर उर्फ सागर जयसिंग भोसले रा. केसरकर पेठ सातारा, विनायक पांडुरंग महाडिक (रा. ढोणे कॉलनी, सातारा) तसेच चंद्रकांत चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याकडून १३०५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तिसऱ्या घटनेत करंजेतील श्रीपतराव शाळेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अस्लम खतीब शेख रा. करंजे सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ६४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Mon 18th Mar 2024 03:29 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Mon 18th Mar 2024 03:29 pm











