साताऱ्यात आकाशात हलणाऱ्या दिव्यांच्या माळा पाहून उडाली अनेकांची घाबरगुंडी

सातारा : सातारा जिल्ह्यात व भागात आकाशात विचित्र हलणारे दिवे एका रांगेत गेल्याचे दिसून आले. हि घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. शहरातील सायंकाळी व ग्रामीण भागात   अनेकाना यांचे दर्शन झाले. अनेकांनी या उडत्या तबकड्या आहेत कि काय असा समज करून घेतला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना हे फटाक्यांचा नवीन प्रकार असल्याचाच समज करून घेतला. या दिव्यांच्या माळांनी अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. याच पध्दतीने सातारा सह ग्रामीण भागात  ही अशीच दिव्यांची माळ नागरीकांना दिसून आली. ही माळ म्हणजे नविन फटाका असल्याचे असल्य़ाचे अनेकांनी म्हटले तर अवकाशात काहीतरी विचित्र घडतयं असा अंदाज अनेकांनी लावला.

याबाबत अधिक माहिती घेतली असता आकाशात विचित्र हलणारे हे दिवे खरेतर उपग्रह आहेत, जे दक्षिण अमेरिकन उद्योजक एलोन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने अवकाशात सोडले असावेत अशी माहिती मिळाली. उपग्रह हे स्टारलिंक नावाच्या गोष्टींचे भाग आहेत. हा स्पेस एक्स द्वारे हजारो कक्षांमध्ये प्रक्षेपित करण्याचा आणि अंतराळ पृथ्वीवर इंटरनेटचा बीम बनवण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. मे 2019 मध्ये प्रथम प्रक्षेपण कनेक्ट्सपासून, स्पेस एक्स ने सुमारे 360 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. प्रत्येकाचे सुमारे 260 किलोग्रॅम असते आणि ते सूर्यप्रकाश परवर्तित करणाऱ्या मोठ्या सोलर कारनेलसह सामान्यपणे सपाच्या आकाराचे असते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

SpaceX चा स्टारलिंक सॅटेलाइट क्लस्टर काय आहे?

स्टारलिंक ही एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे जी लोकांना थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा प्रदान करते. ही सेवा अमेरिकेतील स्पेसएक्स कंपनीने सुरू केली आहे. स्टारलिंकचे नेटवर्क सेट करण्यासाठी, कंपनीने 2018 पासून स्टारलिंक हा उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली.

40 देश उपग्रह सेवेचा लाभ घेत आहेत

इलॉन मस्कला त्याच्या स्टारलिंक इंटरनेट उपग्रहामुळे संपूर्ण जगाला सर्वोत्कृष्ट आणि जलद इंटरनेट अॅक्सेस द्यायचा आहे. सध्या 40 देश या उपग्रह सेवेचा लाभ घेत आहेत. रशिय युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळातही इलॉन मस्क स्टारलिंक उपग्रहाद्वारे यक्रेनला इंटरनेट सविधा उपलब्ध करून दिली होती

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला