कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे सोमवार दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता नदी विमोचक (स्ल्यूस गेट) द्वारे होणारा एक हजार क्युसेक विसर्ग कमी करून ५०० क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक विसर्ग असा एकूण २६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयना धरणाच्या नदी विमोचकातून सुरू असणारा ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोमवार २० रोजी – सकाळी ११ वाजता ५०० क्युसेकने कमी करून नदी विमोचकातून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातून कोयना नदीमध्ये एकूण २६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी कोयना धरणात २५.८१ टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची पातळी २०६८ फूट व ६३०.४०३ मीटर झाली आहे. गतवर्षी याच तारखेला २० मे २०२३ रोजी धरणात २६.७९ टीएमसी पाणीसाठा होता. तर पाण्याची पातळी २०७० फूट व ६३१.०३८ मीटर होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणातील पाणीसाठ्यात फारसा फरक नसून फक्त एक टीएमसी पाणीसाठा यावर्षी कमी आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला