माणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी ! अनेक ठिकाणी मोठे नुकसान

माणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी ! अनेक ठिकाणी मोठे नुकसान

आंधळी :माण तालुक्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रोज सायंकाळच्या सुमारास वादळी  वाऱ्यासह  अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला असून  गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी पाऊस कमी परंतु वारे जास्त स्वरूपाचे असल्याचे चित्र दिसत होते. 
   या अवकाळी पावसामुळे  व वादळी वाऱ्यामुळे उत्तरांमध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला यामुळे माणसांना उन्हामुळे गर्मी निर्माण झाली होती या वातावरणावरणामुळे आता सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. मात्र या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून अनेकांचे  घराची पत्रे उडाले आहेत तर काही ठिकाणी असते म्हणून पडली. दहिवडी पिंगळी, वावरहिरे,पाचवड,थदाळे शिंगणापूर, या भागातील मुख्य रस्त्यावरती  झाडे वाऱ्याने उमरून पडल्याने दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. यावेळी वाहनधारकांनी काही ठिकाणी पर्यायी मार्ग काढत प्रवास केला. या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने अनेकांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी राहत्या घरावरील सुद्धा पत्रे  वाऱ्याने उडून गेले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब  पडल्याने परिसरातील वीज गायब झाल्याने सर्वत्र काळोखेचे साम्राज्य पसरले होते. तर काही ठिकाणी वीज वितरण च्या माध्यमातून तातडीने जोडणी करत सेवा सुरळीत  प्रयत्न करण्यात आले.
    दहिवडी नगरपंचायत च्या घंटागाडीचे वादळी वाऱ्याने नुकसान.
    दहिवडी नगरपंचायत च्या माध्यमातून दिवसभर दहिवडे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येत असतो हीच घंटागाडी सायंकाळच्या वेळी नगरपंचायत च्या बाजूला उभे असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले निलगिरीचे झाड घंटागाडीवर पडून गाडीचे नुकसान झाले. दहिवडी रिलायन्स पंप शेजारी रस्त्यावरती विजेचा खांब पडल्याने वाहतुकीचे सुद्धा नुकसान झाले तर  शिवनेरीवरच्या पाठीमागून सिद्धनाथ कार्यालयात जाणाऱ्या रस्त्यावरती वाऱ्याने लिंबाचे झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. यावेळी दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ व विशाल पोळ यांनी फोन करून वीज वितरण कंपनी व प्रशासनाची यंत्रणा हलवत नुकसान झालेले ठिकाणी सुरळीत करण्यासाठी काम केले

भारतीय हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा!

काल सकाळी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी चक्रीवादळाची निर्मिती होत असल्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार किनारपट्टी लगत ६० ते ७० किमी ताशी वेगाने तर महाराष्ट्रात सुमारे ५०ते ६० किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरल्याचे माण तालुक्यातील लोकांनी चांगलेच अनुभवले.

 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त