धोमच्या डावा कालव्यावरील पूल ढासळला
कालव्यातील पाणी वाहतून केली बंदSatara News Team
- Wed 31st Jul 2024 11:42 am
- बातमी शेयर करा
सातारा : धोम डाव्या कालव्यावर कवठे केंजळ उपसा उपसा सिंचन योजने लागत खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला आहे.यावेळी कालव्यातून सुरू असलेला १०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी ओढ्यातून वाहून गेले. यानंतर विसर्ग बंद करण्यात आला. कोरेगाव तालुक्यातील जिहे कठपूर उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते..सदर पुल ढासळ्ल्यानंतर कालव्यातील पाणी व वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.
धोम डाव्या कालव्यातून वाई, सातारा, कोरेगाव तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते.पावसाळा सुरू असल्याने या हंगामात कोरेगाव तालुक्यातील जिहे कठपूर व
वसना वागंना उपसा सिंचन योजनेच्या उपसासिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश होते.
यावेळी धोम धरणात पाणीसाठा वाढल्याने जिहे कठापूर योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते. वाई, सातारा तालुक्यात असणारा मुसळधार पाऊस यामुळे कालव्यातून पाणी वाहून नेणे धोक्याचे असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले होते. मात्र तरीही १०० क्यूसेक्स पाणी कालव्यातून सोडण्याचे आदेश देण्यात आले. मागील पन्नास वर्षात कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध न झाल्याने कालव्यांच्या अवस्था बिकट झाली आहे.आज रविवारी सकाळी सा. क्र. १२/९३० येथील खानापूर ते शेंदुरजनणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला.
या पुलावरून शेंदुरजनणे, खानापूर, निकाम वस्ती (ता वाई) व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यां कडून वाहतूक सुरू असते. ती वाहतूक आता थांबविण्यात आली आहे.पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातून देण्यात आली.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 31st Jul 2024 11:42 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 31st Jul 2024 11:42 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 31st Jul 2024 11:42 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 31st Jul 2024 11:42 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 31st Jul 2024 11:42 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 31st Jul 2024 11:42 am





