नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
Satara News Team
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २७) सकाळी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर या डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नोकरीवरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.सकाळी सुमारे पावणे आठ ते आठच्या दरम्यान सायन स्थानकातील हाय व्होल्टेज टॉवरवर एक व्यक्ती चढल्याचे पोलिसांना समजले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत खाली येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने टॉवरवरच टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणले.
सदर व्यक्ती डॉ. राजेंद्र रुपनवर असल्याची माहिती समोर आली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी तातडीने CPR देऊन प्राथमिक वैद्यकीय मदत केली. या प्रयत्नांमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.
नोकरीवरून काढल्याचा राग
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर या डॉक्टरवर वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते.
नोकरीवरून झालेल्या कारवाई विरोधात त्याने सायन रेल्वे स्थानकातील टॉवरवर चढून आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे आणि आपल्यावर अन्याय करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्याची मागणी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे सायन रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.बचावानंतर संबंधित डॉ. राजेंद्र रुपनवर यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
@sataraphaltan
स्थानिक बातम्या
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
संबंधित बातम्या
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 27th Aug 2026 12:34 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 27th Aug 2026 12:34 pm













