सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
Satara News Team
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील कोंडवे गावच्या श्रीमती अरुणा यादव- भुजबळ यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे. श्रीमती अरुणा यादव यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी, नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या शिक्षणाधिकारी, पुणे (विद्या प्राधिकरण) येथे साहाय्यक संचालक, राज्यस्तरीय करिअर मार्गदर्शन उपक्रमांमध्ये (युनिसेफ च्या भागीदारीत) महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांची उपसंचालक पदी पदोन्नती झालेले आहे.
कोंडवे येथील संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व विविध संघटनेने तसंच शिक्षण विभागातील मान्यवरांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केलेले आहे. शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव ता. खंडाळा सातारा जिल्ह्यातील श्रीमती अरुणा यादव- भुजबळ यांनी शिक्षण उपसंचालक पदापर्यंत मजल मारली आहे. भविष्यात आणखीन उच्च पदस्थ पदावर त्या विराजमान होतील. असा विश्वास प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते श्री सिद्धेश्वर पुस्तके, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विशाल कणसे, संचालक संजीवन जगदाळे, माजी संचालक ज्ञानेश्वर कांबळे व शिक्षक दत्तात्रय वाघमारे, सौ. मीनाकुमारी वाघमारे, राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ सरचिटणीस संतोष भोजने व ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय (चर्नी रोड, मुंबई) किंवा शिक्षण संचालनालय (पुणे) यांच्या आस्थापना विभागातून हा अधिकृत कार्यभार स्विकारल्याचा आदेश मिळू शकतो, अशी अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे.
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
संबंधित बातम्या
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 20th Aug 2026 06:32 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Thu 20th Aug 2026 06:32 pm











