औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
औंध पोलिस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न; वरिष्ठांनी आता फक्त पाहत बसायचे की चौकशीही करायची?आशपाक बागवान.
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
- बातमी शेयर करा
औंध : पोलिसांकडे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे.अवैध व्यवसायांवर कारवाई करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मग एखादा अवैध व्यवसाय सुरू राहतो, त्यावर कारवाई होत नाही आणि त्याच काळात संबंधित व्यवसायिकांकडून पोलिस ठाण्याशी संबंधित व्यक्तींमार्फत कथितपणे नियमित आणि ठराविक रक्कम घेतली जात असल्याची चर्चा होत असेल, तर या चर्चेची चौकशी होऊ नये का?
हा प्रश्न औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जनतेसमोर आज उभा आहे.अतिरिक्त कामाचा भार असेल तर मोबदला शासनाने द्यावा की अवैध व्यावसायिकांनी?
महसूल, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क यांसह विविध विभागांच्या कामांचा अतिरिक्त भार पोलिसांवर पडत असल्याचे दिसूनही येते आणि सांगितले जाते ते मान्यच आहे. परंतू पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी असेल तर शासनाने त्यांना आवश्यक मनुष्यबळ, साधने आणि नियमाप्रमाणे अधिकृत मोबदला द्यावा.
पण मग दुसरा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे "अधिकृत पगार" आणि "शासकीय मोबदला" असताना अवैध व्यवसायिकांकडून कथितपणे “मंथली” घेतली जात असेल, तर त्या पैशाला अतिरिक्त कामाचा मोबदला म्हणायचे तरी कोणत्या नियमाने? हा प्रशासनाला जनतेच्या मनात निर्माण झालेला प्रश्न आहे.
“मंथली”ची चर्चा खोटी असेल तर चौकशी करून सत्य बाहेर आणा!
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही अवैध व्यवसायांबाबत आणि त्यांच्याकडून कथितपणे नियमित आर्थिक व्यवहार होत असल्याबाबत चर्चा असेल, तर संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी घाबरण्याचे कारणच काय? आरोप खोटे असतील तर चौकशी करा आणि क्लीन चिट मिळवा. पण चौकशीच झाली नाही तर जनतेच्या मनातील संशय अधिकच वाढणार नाही का?म्हणूनच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या विषयाकडे व्यक्तीविरोधी आरोप म्हणून न पाहता प्रशासनातील पारदर्शकतेचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांना जनतेकडून या बातमीच्या आधारे काही थेट प्रश्न आहेत.
१. औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती आहे का?
२. माहिती असल्यास त्यांच्यावर किती कारवाया करण्यात आल्या?
३. कारवाई न झालेल्या प्रकरणांमध्ये त्यामागचे कारण काय?
४. कोणत्याही पोलिस कर्मचारी अथवा मध्यस्थी मार्फत कथित “मंथली” घेतली जाते का?
५. अशी रक्कम घेतली जात असल्याचा आरोप चुकीचा असल्यास संबंधित अधिकारी खुलासा करण्यास तयार आहेत का?
६. पोलिसांवर इतर विभागांच्या कामांचा अतिरिक्त भार असल्यास त्यासाठी शासनाने कोणता अधिकृत मोबदला निश्चित केला आहे?
७. अवैध व्यवसायिकांकडून पैसे घेण्यास परवानगी देणारा कोणताही शासकीय नियम अस्तित्वात आहे का?
८. या सर्व बाबींची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यास प्रभारी अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस प्रशासन तयार आहे का?
या बातमीचा उद्देश व्यक्तीला बदनाम करणे नाही; सत्य बाहेर आणणे आहे.या वृत्तामध्ये कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविण्याचा दावा केला जात नाही. परंतू मंथली घेतलीच आहे, असे अंतिम सत्य म्हणून सांगण्या ऐवजी, तशी चर्चा/आरोप असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी का होऊ नये, एवढाच मूलभूत प्रश्न या वृत्तातून उपस्थित केला जात आहे. कारण अशा बातमी च्या आधारे पत्रकाराचे काम कोणाला विनाकारण दोषी ठरविणे नाही. तर पत्रकाराचे काम प्रश्न विचारणे, प्रशासनाला उत्तरदायी बनवणे आणि जनतेसमोर सत्य परिस्थिती आणण्यासाठी आवाज उठवणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता निर्णय घ्यावा जर आरोप निराधार असतील तर चौकशी करा. सत्य जनतेसमोर आणा
आणि चुकीचे आरोप करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करा आणि जर चौकशीत गैरप्रकार आढळला तर जबाबदारी निश्चित करा. दोषींवर कारवाई करा. आणि पोलिस दलाची प्रतिमा वाचवा.दोन्ही परिस्थितीत फायदा जनतेचाच आहे. म्हणूनच औंध पोलिस ठाण्याच्या कारभाराबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभारी अधिकाऱ्यां कडून लेखी स्पष्टीकरण मागवून आवश्यक असल्यास शो-कॉज नोटीस बजावावी आणि स्वतंत्र चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी पुढे येत आहे.
शेवटी एकच प्रश्न...
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले तर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला गप्प करायचे की प्रश्नांची उत्तरे द्यायची? औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील जनतेला धमकीची नव्हे, पारदर्शक प्रशासनाची गरज आहे. आणि पत्रकाराला कुणाची भीती नसते. पुरावा असेल तर तो प्रश्न विचारतो, आरोप असेल तर तो “आरोप” म्हणूनच मांडतो, आणि सत्य समोर येईपर्यंत चौकशीची मागणी करतो. आता निर्णय वरिष्ठांचा
चौकशी होणार की संशय कायम ठेवला जाणार?
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
संबंधित बातम्या
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 26th Aug 2026 08:57 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Wed 26th Aug 2026 08:57 pm











