पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
‘मीटर नेमका कुठे गेला?’ पोलिसांसमोर तक्रारदाराचा सवाल; तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी.आशपाक बागवान.
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : पुसेसावळी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पूर्वसूचना नाही, लेखी नोटीस नाही, ग्राहकाची संमती नाही आणि पंचनाम्याची प्रतही नाही, अशा परिस्थितीत वडिलोपार्जित घरातील वीज मीटर काढून नेल्याचा आरोप ग्राहकाने केला असून, याप्रकरणी बागवान यांनी औंध पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित घराचे वीज कनेक्शन सुरू असून मीटरची स्थिती ‘नॉर्मल’ असतानाही तो हटविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. शिवाय ₹४,२१० रुपयांचे वीज बिल ऑनलाइन भरल्याचा पुरावाही तक्रारदाराने जोडला आहे. त्यामुळे थकबाकीच्या कारणावरून कारवाई झाली असल्यास, त्यासाठी अधिकृत आदेश कोणाचा होता, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मीटर काढताना वर्क ऑर्डर अथवा जॉब कार्ड होते का? पंचनामा झाला का? रीडिंग व सील क्रमांक नोंदविण्यात आला का? काढलेले मीटर कुठे जमा केले? ग्राहकाला याची लेखी माहिती देण्यात आली का? या बाबींची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, या कारवाईत तानाजी धुमाळ यांच्यासह विजय जाधव सहभागी असल्याचे तक्रारदाराने नमूद केले असून, संबंधित सर्व व्यक्तींचे जबाब घेण्याची मागणी आहे.
मीटर महावितरणच्या मालकीचे असले तरी ग्राहकाच्या घरातून तो हटविताना नियमित प्रक्रिया आणि अधिकृत आदेशाचे पालन झाले का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. कागदोपत्री नोंदी नसल्यास कारवाईचा अधिकार कोणत्या आधारावर वापरण्यात आला, याचा छडा पोलिसांनी लावावा, अशी मागणी आहे.
पोलिसांनी हे प्रकरण केवळ ‘महावितरणची अंतर्गत बाब’ म्हणून न पाहता स्वतंत्र तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मीटर कोणी काढला, कोणाच्या आदेशाने, कुठे नेला आणि सध्या त्याची नोंद कुठे आहे, याचा तपास होऊन अनधिकृतता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारीच्या प्रती गृह विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
आता प्रश्न एकच—मीटर काढण्याचा अधिकृत आदेश होता तर तो दाखवा; पंचनामा झाला असेल तर तो कुठे आहे; आणि मीटर अधिकृतरीत्या हटविला असेल तर तो सध्या कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
@pusesavali
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
संबंधित बातम्या
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 31st Aug 2026 02:30 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 31st Aug 2026 02:30 pm













