जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनांना बळ आणि मेंदूला चालना देणारा बालबाजार: सुनिता मगर.

वडी येथील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग,शिक्षक पालक तसेच ग्रामस्थांनी खरेदीचा लुटला आनंद."

खटाव  : खटाव तालुक्यातील वडी येथील जि. प. प्राथमिक शाळा येथे विविध शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पनांच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच सामाजिक जाणिव दृढ करण्यासाठी बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास ग्रामस्थांसह, पालक-शिक्षक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पहिली ते सातवीच्या विद्यार्थांनी या बालबाजरामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. खटाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका मा.सुनिता मगर यांचे हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या बालबाजारात भाजीपाल्यासह विविध वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शिक्षक, पालकांसह ग्रामस्थांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले.शाळेचे शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती यांनी या बाजाराचे नियोजन केले होते. याचप्रसंगी बोलताना सुनिता मगर म्हणाल्या की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना बळ मिळत असल्याने मन व मेंदू विकसित करण्यासाठी बालबाजारांसारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
यावेळी सरपंच वैशाली मोहीते, माजी सरपंच अनिल सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजीत येवले, सोसायटी चेअरमन राहुल येवले, किशोर येवले, रोहीत येवले, वसंत यादव, विकास अडसुळे तसेच ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

        शनिवार दि.१६ रोजी वडी येथील जि.प.शाळेच्या मैदानावर हा बालबाजार भरविण्यात आला. हा बाजार पाहण्यासाठी गावातील महीलांनी हजेरी लावली. ग्रामस्थांसोबतच शिक्षकवृंदांनीही खरेदीचा आनंद लुटला.

           शाळेच्या उपक्रमाबाबत विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच सुर्यकांत कदम गुरुजींनी त्यांचे स्वागत केले. आणि मुख्याध्यापक श्रीकांत भंडारे गुरुजींनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होत्या.

 

 

   जि. प. प्राथमिक शाळा वडीच्या वतीने राबविण्यात आलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पनांना तसेच भावविश्वाला निश्चितच बळ देणारा ठरणार आहे. समाजभान जपताना, ग्रामस्थ तसेच गावाप्रती असलेली जाणिव यातून विद्यार्थ्यांना दैनदिन, व्यवहारी जीवनात उपयोगी पडणार आहे. हा उपक्रम राबविणा-या सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन आणि कौतुक माजी सरपंच श्री. अनिल सुर्यवंशी.

 

 

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.यांमधे विद्यार्थी उस्फुर्त सहभाग नोंदवतात. आजदेखील अभिरुप बाजाराला जोडून जमा-खर्चाचा ताळेबंद किंवा विक्रीस आणलेल्या पदार्थांची रेसिपी सुवाच्य अक्षरात लिहुन विद्यार्थ्यांना नवीन व अनोखी स्पर्धा उपलब्ध करून दिली आहे.
अभिजीत येवले, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त