ठरलं काँग्रेस आणि वंचित आघाडी या सर्व निवडणुका लढणार एकत्र

सातारा :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस आणि सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

सर्व निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढविणार आहेत,अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत एकत्र येऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली. दोन्ही पक्षांचे या चर्चेद्वारे समाधान झाले.हातात हात घालून साथ देण्याचे ठरले. 

या निवडणुकांबाबत पुढील संवाद आणि बैठक माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत होणार आहे. 

काँग्रेस भवनात नुकतीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीसाठी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ खरात आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त