शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ महत्वाचा..यशवंत गायकवाड

"जवाहर नवोदय विद्यालय खावली येथे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा जिल्हा स्तरीय कार्यक्रम संपन्न..."

सातारा :  शहराजवळ खावली ता.सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि जी २०विषयक सामाजिक जागरुकता  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी(टी.डी.एफ)चे अध्यक्ष श्री.यशवंत गायकवाड बोलत होते...त्यावेळी व्यासपीठावर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य राहूल शामकुवर,शिवाजीराव तावरे, प्रदीप ढाणे,श्रीमती विद्या भोसले आणि जवाहर नवोदय विद्यालय खावलीचे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी व जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर संगम माहुली आणि शाहू अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला व प्रमुख कार्यक्रम नवोदय विद्यालयात संपन्न झाला तेंव्हा...
   कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख स्वागत आणि सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन पूजा अकोटकर मॅडम यांनी केले तर प्रस्ताविक विद्यालयाचे कार्यतत्पर उपप्राचार्य राहुल शामकुमार यांनी केले..
   कार्यक्रमाच्या प्रारंभी माहुली प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी समृद्धी माने आणि कुंभार नामक विद्यार्थ्यांची स्वयंस्फूर्तीने मनोगते झाली तर नवोदय विद्यालयातील रागिनी ठाकरे आणि ऋतुजा आंबेकर यांचीही अभ्यासपूर्ण विषय विवेचने झाली..
   राष्ट्रीय शिक्षण धोरणावर नवोदय विद्यालयातील राम ठाकरे यांनी अभ्यासपुर्ण विचारमंथन केले तर मनीष आंबेकर यांनी जी 20 विषयक धोरणात प्रमुख देश म्हणून आपल्या भारताची भूमिका विषद केली..
   तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री यशवंत गायकवाड यांनी बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व विशद करताना जीवनात खेळाचं अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.मानवाला त्याच्या जीवनाचा कर्णधार बनताना त्याला मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी शारीरिक  सक्षमतेची नितांत गरज असते त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज जमतील असे खेळ खेळू द्या मनसोक्त खेळण्याने मन,मेंदू आणि मनगट सक्षम बनते आणि जीवनातील पुढील वाटचालीस अनन्य साधारण महत्त्व प्राप्त करून देते असे उदगार त्यांनी काढले.. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ आणि खेळाचे प्रकार यांचीही माहिती दिली.. त्यांचेनंतर संगम माहुली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी तावरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा मागोवा घेतला तर प्रदीप ढाणे यांनी जी २० विषयक सामाजिक उपक्रमात भारताचे स्थान या विषयावर जवाहर नवोदय विद्यालयाने आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे कौतुक केले..तर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत जवाहर नवोदय विद्यालयाचे स्थान कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार श्रीमती विद्या भोसले यांनी काढले..
   कोणत्याही कार्यक्रमाची उंची वाढविण्याचे काम हे सूत्रसंचालकाच्या हाती असते ते प्रभावी काम नवोदय विद्यालयाचे अष्टपैलू शिक्षक मनीष आंबेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सोमनाथ वडगावे यांनी मानले...सदर  कार्यक्रमासाठी बी.डी.सूर्यवंशी,आनंद दिवे, श्रीमती सुनीता तेलागवी, अमोल पाटील विद्यार्थ्यांचे पालक आणि विविध विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती होती..

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला