चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
Satara News Team
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
- बातमी शेयर करा
संशयित राजेंद्र शिंदे यांनी अंजली खून करून कॉटखाली कपड्याच्या गाठोड्या च्यामागे लपवून ठेवला होता परंतु अंजली यांच्या अंगावर एकही वर्ण दिसला नाही त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांचे टेन्शन वाढले आहे पती राजेंद्र हा बेशुद्ध असल्याकारणाने तो शुद्धीवर येण्याची पोलीस वाट पाहत आहेत
सातारा : चारित्र्याचा सतत संशय घेणार्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रेयस अनिल कुमार पाटील वय 20 राहणार मेहर देशमुख कॉलनी, करंजे, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे वय 32 राहणार मंगळवार पेठ. मूळ राहणार पानमळेवाडी, पोस्ट वर्ये, ता. सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंजली राजेंद्र शिंदे वय 29 रा मंगळवार पेठ असे मयत पत्नीचे नाव आहे.
मेव्हण्याशी धक्काबुक्की होऊन जखमी झालेल्या संशयिताला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.पती विरोधात सातारा तालुका पोलिसांकडे या आगोदर तक्रार दिली होती दिनांक 19 रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान नवरा बायको मध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या भांडणाची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती.
शुक्रवार दिनांक २० रोजी मुली शाळेत गेल्या होत्या त्यांना घेऊन त्यांचा मामा श्रेयस माघारी आला तेव्हा मुलीला कॉटच्या खालील गाठोड्यात काहीतरी घेण्यात गेली असता तिला पाय दिसले मुलीने याबाबत मामाला कल्पना दिली मामाने कॉटखाली पाहिले असता कपड्याच्या गाठोड्याने झाकलेल्या स्थितीत अंजलीचा मृतदेह आढळून आला दरम्यान श्रेयस पाटील व संशयित राजेंद्र शिंदे यांच्या धक्काबुक्की झाली यात राजेंद्र शिंदे हा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णांना दाखल करण्यात आले
. या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत अंजली शिंदे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबतचा विसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के अधिक तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sun 22nd Jun 2025 10:50 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sun 22nd Jun 2025 10:50 am













