वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

बघणाऱ्या नागरिकांची त्यांच्यावर कौतुकाची थाप

शिवथर :  सातारा येथील राधिका रोडवर कायमच वाहनांची वर्दळ असते त्यातच सकाळच्या वेळी मोठा ट्रक  अचानक बंद पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला त्यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी नागेश खापे निलेश निकम व नगरपालिकेचे कर्मचारी पवार आणि कदम यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत बंद पडलेला ट्रक स्वतः ढकलून बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली हे बघणाऱ्या नागरिकांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या वर कौतुकाची थाप टाकली 


         राधिका रोडवर कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे नागरिकांना येणे जाणे अवघड होत असते त्यामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर फार मोठा बाका प्रसंग निर्माण होतो. परंतु खऱ्या अर्थाने पोलीस कर्मचारी नागेश खापे आणि निलेश निकम नोकरी बजावत असताना जर अशा पद्धतीने सहकार्य करत असतील तर कोणतीही अडचण निर्माण होऊ शकणार नाही यांनी जे सामाजिक काम केलेले आहे याच पद्धतीने सर्वच वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवली तर कोणताही प्रसंग असला तरी तो निभावून जाऊ शकतो

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त