निढळची शाळा देशात रोल मॉडेल ठरेल! खा. शरद पवार
निढळला रयतच्या हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनSatara News Team
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : निढळ ची शाळा देशात रोल मॉडेल ठरेल. तसेच फक्त तीनच महिने थांबा, खटाव, माणचे चित्र बदलेल.येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला.निढळ येथील कार्यक्रमात बोलताना खा. शरद पवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले शाहू, फुले, आंबेडकरांचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही.महाराष्ट्रला या विचारांची नितांत गरज आहे .या महापुरुषांनी महाराष्ट्र घडविला . या तीन महिन्यांनंतर महाविकास आघाडी सरकार येईल मग तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील .असे त्यानी सूचित केले.
याप्रसंगी खा. रामशेठ ठाकूर यांनी हनुमान विद्यालय निढळ शाळेच्या इमारती ला 1 कोटी रुपये दिले .ते म्हणाले शाळेला दान करताना मला आनंद होत आहे .मी पहिले 75 लाख रुपये दिले होते त्यात 25 लाखाची वाढ करून मी 1 कोटी रुपये शाळेला देत आहे.
यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , खा रामशेठ ठाकूर,व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, , विकास देशमुख, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, ऍड रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, जे. के. जाधव, डॉ. मुमताजअली शेख, डॉ. विठ्ठल शिवणकर, बी. एन. पवार, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, नवनाथ जगदाळे.डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
खा. शरद पवार यांनी आणखी पुढे सांगितले, अनेक वर्षे निढळमध्ये येण्याचा
विचार होता. आज रयतच्या कार्यक्रमानिमित्ताने येणे झाले आणि येथील पाणलोटसह ग्रामविकासाची कामे पाहून आनंद झाला. हनुमान विद्यालयाच्या वास्तूत आमूलाग्र बदल करुन सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक इमारतीने आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळावर सामूहिक प्रयत्नातून मात करणारी कामगिरी दळवी व त्यांच्या सहकऱ्यांनी केली आहे. शरद पवारांनी यावेळी समयसूचकता दाखवली.निढळ येथील कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा आणि शैक्षणिक होता. जमलेल्या जनसमुदायाला शरद पवार आगामी विधानसभा निवडणुका ध्यानात घेता काहीतरी राजकीय भाष्य करतील, अशी अपेक्षा होती. संपूर्ण भाषण होईपर्यंत त्यांनी राजकारणावर एकही शब्द उच्चारला नाही. शिक्षण, ग्रामविकास आणि रयत शिक्षण संस्था यावरच ते बोलले. अगदी शेवटी त्यांनी चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या मागणीचा धागा पकडत तीन महिने थांबा, जिहे कठापूरसह सर्वच पाणीयोजना मार्गी लावतो, व सगळे चित्र बदलतो असे वक्तव्य करुन लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सुतोवाच केले. खा रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला शंभर कोटींहून अधिकची मदत केली आहे. खा रामशेठ ठाकूर यांचे सारखे दानशूर लोक असल्याने संस्थेचे अनेक प्रश्न सुटत आहेत. खटाव-माण तालुक्यातील अनेक लोक प्रशासनात मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे थोरा मोठ्यांचे उद्दिष्ट आपणही पुढे नेणे गरजेचे आहे. शाहू-फुले- आंबेडकरांनी त्या काळात विज्ञानवादाचा विचार पेरला होता. समाजात जागृती करण्याचे व्रत त्यांनी जोपासले. दुष्काळावर मात करण्याची आणि शेतीला जोडधंदे निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी राबवली. रयत संस्थेतील विद्यार्थ्यांना अशा थोर लोकांचे विचार आणि माहिती करुन द्यायला हवी, अशी अपेक्षाही खा. पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी सांगितले दानशूर व्यक्ती मुळे रयत शिक्षण संस्था घडली. निढळ येथील निर्मळ समाजाने 10 एकर रोड टच सातारा सोलापूर हाय वे नजीकची जमीन शाळेसाठी दान केली.येथील ग्रामस्थांनी व मुंबई नोकरदार व्यावसायिक संघटना यांनी गावाला व शाळेला खूप मोठी मदत केली
हनुमान विद्यालयाची नूतनीकृत करण्यात आलेली अद्यावत सुविधांनी युक्त इमारत संपूर्ण राज्याला आदर्श रोलमॉडेल ठरणार आहे. रतयच्या उद्दिष्टाप्रमाणे आम्ही शिक्षणातून ग्रामविकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहोत. जिहे कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील निढळ, कातळगेवाडीसह माणमधील वंचित सात गावांच्या साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला मिळण्याची योजना मी सादर केली आहे. त्याचे सर्वेक्षण करावे, अशी मागणीही खा. शरद पवार यांच्याकडे दळवी यांनी केली.
यावेळी आम्ही शोले तील ठाकूर पहिला पण दानशूर ठाकूर पहिल्यांदा पहिला असे शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले .
यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी चा सत्कार करण्यात आला. ऍड. भगीरथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 6th Sep 2024 05:09 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 6th Sep 2024 05:09 pm









