विजयकुमार किसन भुजबळ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

सातारा  : विजयकुमार किसन भुजबळ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झालेला असून याचे वितरण 20 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे होणार आहे   विजयकुमार किसन भुजबळ हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर  तालुका कोरेगाव येथे उपशिक्षक पदावर 2019 पासून कार्यरत आसुन 
या अगोदर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील देवगड तालुक्यामध्ये 2009 पासून नोकरीची सुरुवात केली तर नंतर त्यांनी आंतर जिल्हा बदली सातारा जिल्हा परिषदेकडे 2017 रोजी झाली
2017 या  वर्षी महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दरेतांब या ठिकाणी हजर झाले.  दरेतांब या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी  त्यांनी विविध उपक्रम राबवले यामध्ये  स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा वनभोजन, परिसरभेट, सहली ,वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन तंबाखूमुक्त शाळा यासारखे विविध उपक्रम राबवले
त्याचप्रमाणे समाजाच्या सहभागातून त्यांनी शाळेला संगणक संच, कपाटे विद्यार्थ्यांसाठी दप्तरे, साऊंड सिस्टिम यासारख्या विविध वस्तू  सहजपणे प्राप्त करून दिल्या .
सुभाष नगर शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास यासाठी तंत्रज्ञानातून शिक्षण ,संगणकाचा वापर याद्वारे अध्ययन अध्यापन सुरू केले सुभाष नगर शाळेचे जिल्हास्तरावर तालुकास्तरावर विविध स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यात त्यांचा सहभाग आहे 

शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे www. vkbeducation.com या वेबसाईटचा विद्यार्थ्यांना सातत्याने उपयोग होत आहे..भुजबळ यांनी सामाजिक कार्यात सुद्धा सहभाग घेतला आहे रक्तदान शिबिर ,पूरग्रस्तांना मदत , अनाथालय आश्रमासाठी सातत्याने ते मदत करत आहेत त्याचप्रमाणे ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने कार्य करत असून ते अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आहेत.

भुजबळ यांच्या कार्यामुळे त्यांना शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्था पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2024 जाहीर झाला असून याचे वितरण 20 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे होणार आहे या निवडीसाठी सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी वनिता मोरे, मनीषा चंदुरे, सीमा बर्गे, संगीता नलावडे केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी मुख्याध्यापक शिंदे मॅडम आणि  सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले..

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त