कर्ज प्रकरणी खोटे आश्वासन देऊन शुभम हाउसिंग फायनान्स कंपनीकडून कर्जदारांची मोठ्या प्रमाणात लूट...

दोन दिवसात कर्जदारांचे समाधान न केल्यास रयतराज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार... संदीपभाऊ शिंदे

सातारा : दि. ०२/०९/२४ रोजी रयतराज संघटनेकडे प्राप्त तक्रारी अनुसरून सौ. रुपाली गोरख अवसरे रा. कोंडवे,सातारा व सौ वंदना संजय संकपाळ रा. पाटील नर्सरी शेजारी तुळजाई अपार्टमेंट सातारा. या दोघींना म्हणजेच एकीला घर बांधण्याकरिता व दुसरीला फ्लॅट घेण्याकरिता पैसे हवे होते म्हणून त्यांनी शुभम हाऊसिंग फायनान्स या कंपनीमध्ये कर्जाच्या बाबतीत कंपनी मॅनेजर संघरत्न निवडंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्जाची माहिती देताना तुम्हाला १२% व्याजदराने लोन मंजूर करून देतो, त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचे २५०००० रु.( दोन लाख पन्नास हजार रुपये ) खात्रीशीर मिळवून देतो असे सांगत त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडले.

 

 शासनाची एवढी मोठी रक्कम आपणाला मिळते या आमिषाला बळी पडून त्यांनी कर्ज घेण्यास होकार दिला. २०१९ मध्ये फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड १२% व्याज दराने कर्जदार रेगुलर हप्ते भरत होते. मात्र गेल्या काही वर्षात कर्जदारांना कोणतीच पूर्वकल्पना न देता कंपनीने अचानक व्याजदर१८% वर वाढीवला त्याचबरोबर पेनल्टी सारखे नियमही लावले त्यामुळे पाच वर्ष रेग्युलर पैसे भरल्यानंतर आज कर्जाची मुद्दल फिटूनही घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त पैसे आम्ही फायनान्स कंपनीला देणे लागतो असे वारंवार सांगितले जाते...

 

 रयत राज संघटनेकडे आलेल्या तक्रारदार सौ वंदना सपकाळ यांनी दि.२९/०८/२०२२ रोजी कंपनीकडून घेतलेल्या लोन स्टेटमेंट मध्ये कर्जफेडीची २३५ महिने मुदत दाखवण्यात आली जे की भरलेले पैसे आणि झालेले महिने त्यानुसार अगदी बरोबर असताना मात्र दि. २६/०६/२४ च्या लोन स्टेटमेंट मध्ये अचानक ३३० महिने कर्जफेडीची मुदत दाखवण्यात आली याबाबत विचारणा करायला गेले असताना तुम्हाला तेवढीच रक्कम भरावी लागेल असे दरडावून सांगितले जाते. ज्या ठिकाणी हे कर्जदार काम करतात त्या ठिकाणी कंपनीचे गुंड जाऊन दमबाजी करतात, त्यांचे घरी जाऊन घराला सिल लावीन म्हणून धमकी देतात, याबाबत फायनान्स कंपनीमध्ये विचारायला गेले असता तेथील स्टाफ या महिलेंकडे बघून कुचेष्टेने हसतो. हा असा कोणता कायदा आहे..? शासनाच्या योजनेचे पैसे मिळवून देतो आमच्याकडून कर्ज घ्या असे सांगणे ही सरळ सरळ कर्जदारांची फसवणूक नाही का..? RBI नी यांना गुंड पाळायची परवानगी दिली आहे का..? अशा अनेक प्रश्न यांच्यासारख्या शुभम हाऊसिंग फायनान्स कडून घेतलेल्या अनेक कर्जदारांना पडले आहेत...

 

कर्जदार अति सामान्य कुटुंबातील असून स्वतःच्या जीवाची वडातान करून आजपर्यंत त्यांनी या कर्जाचे हप्ते रेगुलर फेडलेले आहेत मात्र या प्रायव्हेट कंपन्यांकडून अशा पद्धतीने जर फसवणूक होत असेल तर रयतराज संघटना शांत बसणार नाही येत्या दोन दिवसात कर्जदारांचे कायदेशीर रित्या ही फायनान्स कंपनी समाधान करू शकली नाही तर रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला