कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू ....उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते उद्घाटन
- Satara News Team
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
- बातमी शेयर करा
पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी पाच दिवस उशिराने सुरू होत असून चालू वर्षीचा हंगाम गुरुवार ५ सप्टेंबरपासून सुरू झाले . फुलोत्सवाचे उद्घाटन साताऱ्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज यांच्या हस्ते पार पडले
प्रतिपर्यटक दीडशे रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार येणे तसेच सोबत महाविद्यालय प्राचार्याचे पत्र आवश्यक आहे. बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.
कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करणे बाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून यावर्षी हंगामासाठी साधारणपणे १३० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृह, पिण्यासाठी मिनरल वॉटर, विश्रांतीसाठी सहा नैसर्गिक झोपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर, टोपली कारवी यासह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात पोषक वातावरणानुसार फुलांचे गालीचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
हंगामासह इतर नियोजनाबाबत वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांची बैठक झाली. येत्या काही दिवसात पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करूनच कास पठारावरील फुले पाहण्यासाठी यावे.
दत्तात्रय किर्दत, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती
स्थानिक बातम्या
सन 2019 पूर्वीच्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बंधनकारक
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ च्या रुग्णवाहिकेचे आमदार घोरपडेंच्या हस्ते लोकार्पण
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
संबंधित बातम्या
-
केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
मृद,जल संधारणाच्या कामांच्या नावाखाली निधी हडपला : सुशांत मोरे
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
शिक्षकाची बदली रद्द करा अन्यथा आमच्या मुलांचे दाखले परत द्या
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आजपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन
- Thu 5th Sep 2024 06:42 pm
-
डॉ. शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जाहीर
- Thu 5th Sep 2024 06:42 pm