अंधार युगातील ज्ञानज्योत महात्मा जोतीबा फुले ***

जोतीबा यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्ह्य़ातील कटगुण येथे झाला.वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. गोविंदरावचा  व्यवसाय फुलेविक्रीचा होता त्या मुळे त्याचे आडनाव फुले झाले.जोतीबाचा जन्म अंधार युगात झाला.कारण आपल्या देशावर इंग्रजाचे राज्य होते.बहूजन लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. जातीपातीच व अंधश्रद्धाचे ते युग होत.
      अज्ञान , दुष्ट रूढी परंपरा आणि भयंकर दारिद्र्यने   समाजाला ग्रासुन टाकले होते.मुठभर  लोकांच्या हाती विद्यादान  होते.तर बहुजन समाजाला ज्ञान काय हेही समजत नव्हते .
स्त्रियांची अवस्था तर गुलामासारखी होती.समाजातील दलित वगाॅला कोणी जवळ घेतले नव्हते. स्त्रीयांना शुद्र आणि   अबला मानीत होते .स्त्रीची भूमिका म्हणजे राधा वाडा ,उष्टी काढा अशी प्रतिमा होती.
  . अशा काळात  छळ, मानापमान, कष्ट सहन करीत ,दिवस रात्र जोतीबानी आपला देह झिजवला . .
जोतीबानी मानव समाजाला प्रकाश दाखवला.
जोतीबा वर्षाचे झाले असताना त्याची आई चिमणाबाई या जगातून गेल्या. लहान जोतीबा यांचे  संगोपन करण्यासाठी  गोविंदरावनी  लग्न केले नाही; तर  एक दाई   ठेवली आणि त्या  दाईने जोतीबाचे हे खूप मायेने संगोपन केले.गोविंदरावानी जोतीबा सात वर्षाचे असताना, त्यांना प्राथमिक मराठी शाळेत दाखल केले.
           पुढे जोतीबा बारा वर्षांचे झाले असताना त्याचा शुभ विवाह  नायगाव येथिल आठ वर्षीच्या सावित्रीबाई यांच्याशी विवाह सोहळा पार पडला. जोतीबा यांनी आपल्या पत्नीला घरी शिक्षण देणेसाठी शिक्षक नेमले .सावित्रीबाईनी शिक्षण घेतले. या शिक्षणातून जोतीबा यांनी दीन-दलित मुलीसाठी पुणे येथिल बुधवार पेठेतील  भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलीची शाळा काढली. सावित्रीबाई फुले ह्या त्या शाळेत जात असताना त्यांना या कामातून  त्रास व्हावा त्यांनी    हे काम करू नये म्हणुन त्याच्या अंगावर  समाज कंटकानी   चिखल टाकला ,नासकी अंडी मारली ,मानवी विष्ठा टाकली .तरी सुध्दा  सावित्रीबाई आपल्या कामातून विचलित न होता ,सतत कार्यरत राहील्या .
सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणनातील भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका होत्या. गेली शेकडो वषॅ महिलांच्या पत्रिकेत शिक्षणाचा योग नव्हता .पण सावित्रीबाई फुले जन्माला आल्या  मुळे महिलांच्या पत्रिकेत शिक्षणाचा योग महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या मुळे  आला.आज समाजात ५०% हून जादा महिला शक्ती  पुरूषा बरोबर  खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.यातच सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले याचे कामाचे मोठेपण दिसुन येते
".इवलेसे रोप लावियलेदारी त्याचा वेलू गेला गगणावरी "
  अशी महती पाहिला मिळत आहे.
आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी होत्या. त्या नंतर आता भारत देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या. तर आता सद्या चालू स्थितीत भारताची दुसरी महिला १५ व्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  या  आहेत. हे सवॅ श्रेय फुले दाम्पत्याना  जात.
       महात्मा फुले यांना मारेकरी दोन घातले होते. यांच्या हातात तलवारी होत्या. पण जोतीबा त्या मारेकराशी चर्चा करून; मी काहि चूक केली नाहि तर गोरगरीब दीन-दलित लोकांसाठी काम करतोय मला मारून आपणाला आनंद होत असेल तर जरूर मारा .त्या मारेकऱ्यांना पश्चाताप झाला आणि तेच मारेकरी त्याचे सेवक अनुयायी झाले .महात्मा फुले यांचा  स्त्रियांचे, दलितांचे शेतकऱ्याचे , कामगारांचे प्रश्न त्यानी शासन दरबारी  आपल्या 'दीनबंभू ' या साप्ताहिकातुन  मांडले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त