पुसेसावळी दुरक्षेत्रातून चक्क अवकाश आणि भुगर्भ सारख्या दुर... च्या क्षेत्रावर नजर?

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत ने दत्त चौकात बसविलेले सिसीटीव्ही कॅमेरेच असुरक्षित?

पुसेसावळी :  पुसेसावळी येथे झालेल्या हत्याकांडात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख करून पकडण्यात दत्त चौकात ग्रामपंचायत मार्फत बसविण्यात आलेल्या सिसीटीव्ही ने मोठे योगदान दिले आहे. त्याशिवाय पुसेसावळी म्हणजे तालुक्यातील वडूज नंतर ची दोन नंबर ची बाजारपेठ निर्माण झाली आहे. दोन नंबर ची याचे दोन्ही अर्थ परिपुर्ण लागू होणे स्वाभाविक आहे. पहिला अर्थ तालुक्यातील बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ याचे श्रेय ग्रामपंचायत पुसेसावळी यांस जाते. तर दुसरा अर्थ तालुक्यातील दोन नंबर म्हणजे अवैध व्यवसाय सुरक्षित असलेली बाजारपेठ याचे श्रेय औंध पोलिस ठाण्याच्या विद्यमान कारभाऱ्यांना देणे परिहार्य आहे. कारण त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुटखा, मटका, गांजा, बेकायदेशीर दारू विक्री सह अलिकडच्या काळात व्हाईट पाऊडर सारख्या पदार्थांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. परंतू याची किंचीतही कल्पना संबंधित पोलिस प्रशासनास नाही? हि लाजिरवाणी बाब आहे.
       
          दत्त चौक म्हणजे विटा ते महाबळेश्वर, सांगली ते सातारा आणि कराड ते दहिवडी या मार्गांचे एकत्रित होणारा असा महत्त्वपूर्ण चौक आहे. तसेच याच चौकातून अवैध वाळू, मुरूम तसेच अन्य गौण खनिज वाहतूक आणि त्याचबरोबर अवैध असलेल्या अनेक प्रकारची वाहतूक राजरोसपणे सुरू असते.  तर वाहतूक कोंडी, वाहतुकीच्या प्रमाणातील वाढ यामुळे बहुतांश अपघात या चौकात आजअखेर झालेले आहेत. याबरोबरच रहदारीमुळे वाहणांची तसेच इतर वस्तूंच्या चोरींचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे.याची दखल घेत पुसेसावळी ग्रामपंचायत कडून दत्त चौकात सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचा संपूर्ण सेटअपसह बॅकअप पुसेसावळी दुरक्षेत्रात देण्यात आले आहे. चौकात असलेले सिसीटीव्ही कॅमेरे पाहून घडलेल्या घटनेबाबत शहानिशा करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात जातात. कॅमेरे बंद असल्याचे ऐकून हताश होऊन परतताना दिसून येत आहेत. परंतू बऱ्याच दिवसांपासून सदरच्या कॅमेऱ्यांच्या प्रक्षेपणाकडे संबंधित पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष आहे की पुसेसावळी वर येणाऱ्या कोणत्यातरी अवकाश आणि भुगर्भातून अपरिचित संकटाचा पोलिस प्रशासन शोध घेत आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

 

एसपी साहेबांची दूरदृष्टी... तर औंध च्या कारभाऱ्यांची दृष्टीच दूर...

            पुसेसावळी च्या काही ग्रामस्थांनी  २९ मार्च रोजी एस.पी. साहेबांची भेट घेत सुरू असलेल्या काही गैर प्रकाराबाबत भिती व्यक्त केली होती. त्यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी "दुरदृष्टी" ने अंदाज घेत तत्काळ औंध पोलिस ठाण्याचे कारभारी यांना पुसेसावळी च्या प्रत्येक चौकात तातडीने पोलिस फंडातून सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सर्वे करून अपेक्षित खर्चाचा अहवाल सादर करण्याचे फोनवरून तत्काळ आदेश दिले होते. त्यानंतर औंध च्या विद्यमान कारभाऱ्यांना काही दिवसांनी संबंधित ग्रामस्थांनी एस.पी. साहेबांनी सांगितले नुसार सिसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत विचारणा केली असता पोलिस फंड एवढा नसतो. मी सरपंचांशी बोललो आहे.त्यांनी करून घेतो बोललेत. असे सांगत एस.पींचे आदेश झूगारून लावल्याने आजपर्यंत चौकाचौकात बसणारे सिसीटीव्ही तर बसलेच नाहीत. परंतू दत्त चौकात जे आहेत त्याचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.याच दरम्यान ग्रामपंचायत शेजारी कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांवरच वाईट नजरेने पाहत असल्याचे कारणास्तव मोकाट युवकांस ७ जुलै रोजी पोलिस दुरक्षेत्रात बोलावून प्रसाद देण्यात आल्याची चर्चा आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या महिला पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर "दृष्टीच..दूर" असलेल्या या कारभाऱ्याच्या नियंत्रणात औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेसावळी सह अन्य गावे सुरक्षीत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त