हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकाला विसरलेली बॅग लाखो रुपयांचा ऐवजा सह केली परत

भुईंज  : हॉटेल व्यावसायिकाने ग्राहकाला विसरलेली बॅग केली प्रामाणिकपणे परत लाखो रुपयांचा ऐवज पोलिसांच्या समोर बॅग मालकास दिल्याने सुधीर यादव यांचे सर्वत्र कौतुक,

याबाबत सविस्तर माहिती अशी की महामार्गावरील सुरुर येथील हॉटेल साई पार्क ईन येथे पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या खाजगी बस मधील प्रवासी शुभम साईबाबा गोडसेलवार रा,पुणे यांची बॅग हॉटेलमध्ये विसरली होती,व बस तशीच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली दरम्यान ही बॅग हॉटेल मालक सुधीर यादव यांच्या नजरेस पडली व त्यांनी बॅग मालकाचा शोध सुरू केला,
     काही वेळाने संबंधित बॅग मालकाने यादव यांचेशी सम्पर्क झाला व त्यांना भुईंज पोलीस स्टेशनमध्ये बोलवून रीतसर खातरजमा करून बॅग भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे हस्ते देण्यात आली,
     सुधीर यादव यांनी यापूर्वी ही अनेक ग्राहकांना विसरलेले ऐवज   व किंमती वस्तू परत केल्या आहेत, सुधीर यादव यांच्या या प्रामाणिकपणा ची दखल घेत लवकरच त्यांना जिल्हा पोलीस दलाचे वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे स,पो,नी गर्जे यांनी सांगितले यावेळी स्वराज यादव व हॉटेल साई पार्क चे सर्व कर्मचारी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त