शारदाश्रम जकातवाडी येथे वन्यजीव सप्ताहनिमित्त विविध स्पर्धा उत्साहात उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

सातारा : भा.भ.वि.वि. संस्थेच्या शारदाबाई पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जकातवाडी येथे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहात शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व वन्यजीव विषयक गटनिहाय निबंध,चित्रकला,वक्तृत्व,रांगोळी,प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय हरित सेना आणि वनविभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ता जनजागृती कार्यक्रम तसेच नेचर फॉर सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वन्यजीव सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी प्रा.भाई माने,कादंबरी माने,लक्ष्मण ढाणे,दिलीप सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. नेचर फॉर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास जगताप,जनार्दन भोसले,किरण अहिरे,सत्यजित गुजर,उमेश काळे,जयदीप धनावडे,जकातवाडीचे सरपंच उत्तम सणस उपस्थित होते. वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते. वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मत प्रा.भाई माने यांनी व्यक्त केले.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त