सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा आंदोलनाचा इशारा

सातारा : सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने एक डिसेंबर 2023 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशन दुकानदारांना धान्य वितरणात कराव्या लागणाऱ्या तांत्रिक कसरती, त्यातून मिळणारे तुपपुंजे उत्पादन यामुळे रेशन दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.

यासंदर्भातील त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये हजारो रेशन दुकानदार आहेत. सर्वत्र महागाईचा उच्चांक झालेला असताना रेशन दुकानदार मात्र तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाची गुजरात करताना मेटाकुटीला आला आहे. रेशन धान्य प्रणाली मध्ये पॉस मशीनची अडचण, सर्व्हर समस्या, पारंपारिक प्रशासकीय तांत्रिक अडचणी यामुळे दुकानदाराला जिने नकोसे झाले आहे. दुकानदारी करताना अनंत अडचणी येत आहेत. यापूर्वी शासनाने केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणल्यानंतर पंचावन्न हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्याची कसली दखल शासनाने घेतली नाही. मात्र ही वेळ आता रेशन दुकानदारावरून येऊ नये याकरता हा आंदोलनाचा मार्ग निवडला जात असल्याचे श्रीकांत शेटे यांनी सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला