विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी अर्थसंकल्पात तब्बल ९३ कोटींची तरतूद

फलटण - राज्याच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल ९३ कोटी रुपयांचा भरीव विकास निधी मंजूर झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश आले आहे. या भरघोस निधीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. फलटण-कोरेगाव मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांनी कायम झुकते माप दिले असल्याची भावना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली असून, मंजूर झालेली सर्व विकासकामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या सर्वांगीण विकासाचा खऱ्या अर्थाने ध्यास घेतला आहे. त्यांनी यापूर्वी फलटणमध्ये प्रशासकीय इमारत, महसूल भवन, फलटण शहराच्या अंतर्गत जाणारा पालखी महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, तारांगण, अद्ययावत स्टेडियम यांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी शेकडो कोटींचा निधी आणला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश विकासकामे ही प्रत्यक्षात सुरू सुद्धा झाली आहेत. फलटणच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या अर्थसंकल्पातून एवढा मोठा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आणि फलटण कोरेगाव मतदार संघातील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

या अर्थसंकल्पीय निधीतून मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण रस्ते आणि विकासकामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावित प्रजिमा-८७ पासून सासवड भाडळे बु.- सोनवडी बु- विडणी- सांगवी रस्ता प्रजिमा-८८ चे मांगोबामाळ ते सांगवी या भागात संरक्षक भिंतीसह रुंदीकरण करणे, गिरवी मांडवखडक वाखरी निरगुडी निंभोरे फड़तरवाडी जिंती को-हाळे रस्ता प्रजिमा ९ वर कॅनाल डक्टखाली आरसीसी गटर रस्त्यासह बांधकाम करणे, रामा १५ ते काळज सासवड हिंगणगाव सालपे ते रामा ११७ रस्ता प्रजिमा ५ ची रेल्वे क्रॉसिंग ते रा.मा. ९६५ ड भागात रुंदीकरणासह सुधारणा करणे, जिंती साखरवाडी बडेखान नांदल बीबी वाघोशी ताथवडे उपळवे दऱ्याचीवाडी बोडकेवाडी गिरवी रस्ता प्रजिमा ८ ची तरडफ ते उपळवे भागात सुधारणा करणे, याच रस्त्याची बोडकेवाडी ते दऱ्याचीवाडी भागात बाह्य सुधारणा करणे, प्रजिमा ९ रस्ता ते फड़तरवाडी सोमंथळी प्रजिमा ८७ रस्ता प्रजिमा-१०९ ची कांबळेश्वर रोड ते सोमंथळी भागात सुधारणा करणे, प्ररामा १५ ते कापडगाव आरडगाव हिंगणगाव कापशी आळजापूर चिलेवाडी भाडळे शेंदूरजणे कोरेगाव रस्ता प्रजिमा ४ ची आरडगाव ते हिंगणगाव भागात काँक्रीट गटर व गावातील सीसी रस्ते सुधारणा करणे, प्रजिमा -१० गिरवी ते दुधेबावी वडले-पिंप्रद-राजाळे-सांगवी ते प्रमुख जिल्हा मार्ग ६ रस्ता प्रजिमा-८७ ची जानुबाई मंदिराजवळ राजाळे येथे संरक्षक भिंतीसह बाह्य सुधारणा करणे, भुईंज देगाव राऊतवाडी वाघोली पिंपोडे तडवळे ते रा.मा. ११७ रस्ता प्रजिमा-२१ ची राऊतवाडी ते पिंपोडे भागात सुधारणा करणे, वाई परखंडी मुंगसेवाडी धावड वळे साळशी नांदवळ सोनके पिंपोडे रस्ता प्रजिमा-१८ ची शनी मंदिर ते पिंपोडे भागात सुधारणा करणे आणि पोलादपूर वाई वाठार भाडळे दहिवडी रस्ता रा.मा. १३९ ची पिंपोडे ते चिखले भागात सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे.

तसेच भुईंज देगाव राऊतवाडी वाघोली पिंपोडे तडवळे ते रा.मा. ११७ रस्ता प्र.जि.मा. २१ ची सुधारणा करणे, प्राजमा-७ ते पवारवाडी- हणमंतवाडी-मुंजवडी-राजुरी- कुरवली बु. आंदरूड-जावली ते प्रमुख जिल्हा मार्ग १३ रस्ता प्रजिमा-८९ ची राजुरी ते कुरवली बु. भागात रुंदीकरणासह सुधारणा करणे, प्रस्तावित प्राजमा-८७ पासून सासवड भाडळी बु. सोनवडी बु- विडणी- सांगवी रस्ता प्रजिमा- ८८ ची फलटण शिंगणापूर रस्ता सोनवडी बु ते फलटण-पंढरपूर रस्ता विडणी भागात सुधारणा करणे, प्रमुख जिल्हा मार्ग -१० गिरवी ते दुधेबावी वडले-पिंप्रद- राजाळे - सांगवी ते प्रमुख जिल्हा मार्ग ६ रस्ता प्रजिमा-८७ ची गिरवी ते दुधेबावी भागात सुधारणा करणे, फलटण कुरवली मांडवखडक दालवडी उपळवे  कुळकजाई रस्ता प्रजिमा ६७ ची सीतामाई घाट पायथा ते तालुका हद्द भागात संरक्षक भिंतीसह सुधारणा करणे, प्रमुख जिल्हा मार्ग -१० गिरवी ते दुधेबावी वडले-पिंप्रद- राजाळे-सांगवी ते प्रमुख जिल्हा मार्ग ६ रस्ता प्रजिमा-८७ ची सांगवी ते सांगवी बंगला भागात सुधारणा करणे, प्राजमा ६ रस्ता ते मुरूम पिंपळवाडी फड़तरवाडी ते प्राजमा १० रस्ता प्रजिमा-१०६ ची फड़तरवाडी ते प्राजमा १० भागात सुधारणा करणे, नांदल सुरवडी पिंपळवाडी होळ रस्ता प्रजिमा १२ रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, सोळशी करंजखोप सर्कलवाडी राऊतवाडी अनपटवाडी दहिगाव वाठार स्टेशन इजिमा ६९ ची सुधारणा करणे, देहिगाव ते रा.मा. १३९ रस्ता ग्रा.मा. १८१ रस्त्याची सुधारणा करणे आणि सोनके वळे वस्ती जोडरस्ता रस्ता ग्रा.मा. ९ ची सुधारणा करणे ही कामे मंजूर झाली आहेत.

या व्यतिरिक्त नायगाव ते करंजे रस्ता ग्रा.मा. ३ ची सुधारणा, घिगेवाडी जोडरस्ता रस्ता ग्रा.मा. १९ ची सुधारणा, चौधरवाडी जोडरस्ता रस्ता ग्रा.मा. १७ ची सुधारणा, रामा १३९ ते फड़तरवाडी जोडरस्ता रस्ता ग्रा.मा. २३ ची सुधारणा, आंदरूड बरड गुणवरे ग्रा.मा. ११७ ची बरड ते गुणवरे भागात सुधारणा, सासवड पाटील वस्ती दुधेबावी रस्ता ग्रा.मा. १८६ ची रा.मा. ६० भाडळी खुर्द पाटीलवस्ती भागात सुधारणा, फलटण दहिवडी रस्ता ते सासवड रस्ता ग्रा.मा. १८५ ची सुधारणा, सासवड ते झिरपवाडी रस्ता प्र.जि.मा. ८८ ते झिरपवाडी ग्रा.मा. १११ ची सुधारणा, रा.मा. १४७ ते तरटेवस्ती रस्ता फलटण पुसेगाव रा.मा. १४७ ते  तरटेवस्ती ग्रा.मा. २६३ ची सुधारणा, विमानतळ ते ठाकुरकी रस्ता एमडीआर-६७ ते चिमणी शाळा ग्राम- २३९ रस्ता सुधारणा, ठाकुरकी ते शेलारवस्ती रस्ता फलटण नगर पालिका हद्द ते बाणगंगा फाटा ग्रा.मा. व्हीआर- २४४ भागात सुधारणा, विमानतळ ठाकुरकी रस्ता ते पद्मावती मंदिर ठाकुरकी तावडी रस्ता ग्रा.मा. २४० सुधारणा, वाठार वाखरी ढवळपाटी ते तरडफ ग्रामा २२६ रस्ता सुधारणा, ढवळ ते ताथवडा रस्ता ग्रा.मा. २७० ची ढवळ ते मानेवाडी भागात सुधारणा, निरगुडी ते सासवड रस्ता ग्रामा १७८ ची सुधारणा आणि वाठार वाखरी ढवळपाटी ते तरडफ ग्रा.मा. २२६ ची वाखरी ते वाठार भागात सुधारणा ही कामे देखील मार्गी लागणार आहेत.

पुढील कामांमध्ये ताथवडा ते शिंदमाळ रस्ता ग्रा.मा. २२४ ची ताथवडा ते झडकवाईचीवाडी भागात सुधारणा, जाधववाडी ते गिरवी रस्ता ग्रामा १९३ ची सुधारणा, कुरवली खु. मिन्याचीवाडी रस्ता ग्रा.मा. २२९ ची कुरवली खुर्द ते रा.मा. १४७ भागात सुधारणा, जाधववाडी पंचबीगा ते गोखळी रस्ता ग्रा.मा. १४२ ची प्र.जि.मा. ७ ते पंचबीगा भागात सुधारणा, ढवळेवाडी पंचबीगा ते रामओढा रस्ता ग्रा.मा. १४१ ची ढवळवाडी ते प्रजिमा भागात सुधारणा, प्राजमा-७ ते पवारवाडी- हणमंतवाडी-मुंजवडी-राजुरी- कुरवली बु. आंदरूड-जावली ते प्रमुख जिल्हा मार्ग १३ रस्ता प्रजिमा-८९ ची राजुरी ते कुरवली बु. भागात रुंदीकरणासह सुधारणा, निंबळक बड्ल/तिरपवाडी ते रा.मा.६० रस्ता प्रा.मा. ९५ ची रा.मा. ९६५ ते इरिगेशन बंगला भागात सुधारणा, मठाचीवाडी कारंडेवस्ती ते चव्हाणवस्ती रस्ता ग्रा.मा. १०९ ची मठाचीवाडी ते चव्हाणवस्ती भागात सुधारणा, खटके वस्ती ते डोंबळे वस्ती रस्ता ग्रा.मा.११४ ची फलटण आसू प्रजिमा ७ डाँवाळे वस्ती भागात सुधारणा, भाग साठे ते तावरे वस्ती रस्ता ग्रा.मा. १०४ ची साठे ते तावरे वस्ती भागात सुधारणा, पाडेगाव ते फार्म ते रा.मा. ११७ रस्ता ग्रा.मा. १ ची रा.मा ११७ ते फार्म भागात सुधारणा, तरडगाव ते गायकवाडवस्ती भाग रावडी खुर्द ग्रा.मा. १३ ची तरडगाव ते माळेवाडी भागात सुधारणा, प्रजिमा-६ ते बोबडेवस्ती रस्ता ग्रा.मा. १४ ची प्रजिमा ६ ते बोबडेवस्ती भागात सुधारणा आणि विठ्ठलवाडी ते प्रजिमा ८६ रस्ता ग्रामा २९२ ची सुधारणा यांचा अंतर्भाव आहे.

यासोबतच तावडी हरिजनवस्ती रस्ता ग्रा.मा. २९८ ची रा. मा ११७ ते तावडी भागात सुधारणा, तरडगाव एनएचएआय १६५ ते विठ्ठलवाडी रस्ता ग्रामा २८९ चे काँक्रीटीकरण करणे, सोमंथळी हनुमाननगर रस्ता ते फणसमळा रस्ताग्रा.मा. ६८ ची ग्रा.मा. ६७ हणमंतवाडी ते अलगुडेवाडी फार्म भागात सुधारणा, सरडे ते शेंडगेवाडी रस्ता ग्रा.मा. १०३ ची सरडे सोनगाव भागात सुधारणा, टाकळेवाडा ते फुलेवस्ती ग्रा.मा. ९८ ची टाकळेवाडा फुले वस्ती भागात सुधारणा, पिंप्रद ते सोनवडी रस्ता ग्रा.मा. १७७ ची पिंप्रद ते सोनवडी भागात सुधारणा, फलटण-बारामती रोड रा.मा.६० कांबळेश्वर ग्रा.मा.३४ रस्ता सुधारणा, फलटण आसू रस्ता ते काळजेवस्ती रस्ता ग्रा.मा. ७३ ची विडणी ते भिवरकर वस्ती भागात सुधारणा, शिंदेवाडी ते हनुमाननगर ग्रा.मा. ५६ ची फलटण खुंटे रस्ता ते हनुमान नगर भागात सुधारणा, चौधरवाडी ग्रा.मा. ३४ १८ फाटा ते फड़तरवाडी रस्ता सुधारणा, पिंपळवाडी ते ७ सर्कल रस्ता ग्रा.मा.२९ ची साखरवाडी ते ७ सर्कल भागात सुधारणा, सुरवडी ते ९ सर्कल वाडी रस्ता ग्रा.मा. ३५ ची फड़तरवाडी पिंपळवाडी साखरवाडी रस्ता ते सुरवडी भागात सुधारणा, भुरकवडी ते हिंगणगाव रस्ता ग्रा.मा. ३०३ ची हिंगणगाव ते भुरकवडी भागात सुधारणा, रामुसेवाडी ते प्रजिमा- ८ रस्ता ग्रा.मा.२५८ ची सुधारणा, कुंजळेवस्ती ते धनगरवाडा रस्ता ग्रा.मा.२७३ ची प्र.जि.मा. ४ कुंजळे वस्ती भागात सुधारणा आणि प्र.रा.मा. १५ ते काशीदवाडी रस्ता ग्रा.मा.२५२ ची फलटण पुणे रस्ता ते काशीदवाडी भागात सुधारणा ही कामे करण्यात येतील.

तसेच कुरवली खुर्द विचुर्णी ते निरगुडी रस्ता ग्रा. मा. २०७ ची निरगुडी ते विचुर्णी तावडी भागात सुधारणा, गुणवरे ते मांगोबामाळ रस्ता ग्रा.मा.१२० ची रा. मा. १२१ ते मांगोबामाळ भागात सुधारणा, राजाळे हरिजनवस्ती रस्ता ग्रा.मा.८९ ची प्र. जि. मा. ७ ते हरिजनवस्ती भागात सुधारणा, प्र.जि.मा. १५ वरड ते वागेवाडी ग्रा.मा. ११९ रस्ता सुधारणा, निंबळक ते निंबळकनाका रस्ता ग्रा.मा. ९६ चे प्र.जि.मा. १५ वरड ते वागेवाडी भागात काँक्रीटीकरण करणे, निंबळक ते बाबा ढाबा रस्ता ग्रा.मा. ९७ चे एमडीआर ९० निंबळक ते प्र.रा.मा. १५ भागात काँक्रीटीकरण करणे, सासवड मुळीकवाडी रस्ता ते नांदल रस्ता ग्रा. मा. २८४ ची प्र.जि.मा. १२ नांदल ते मुळीकवाडी भागात सुधारणा, सासवड काळज रस्ता ते माळीबंद रस्ता ग्रा.मा.२८३ चे प्र.जि.मा. ५ ते ग्रा.मा. २८२ भागात काँक्रीटीकरण करणे, प्रांजमा-५ ते बदाचामळा ग्रा.मा. ३०५ ची प्र.जि.मा. ४ ते हरिजन वस्ती भागात सुधारणा, रा.मा.-१४९ ते खराडेवस्ती आदर्की बु. ग्रा.मा. ३११ चे ग्रा.मा. १४९ ते खराडे वस्ती भागात काँक्रीटीकरण करणे, कापडगाव चव्हाणवाडी ते तरडगाव रस्ता ग्रा.मा. २९३ चे तरडगाव ते चव्हाणवाडी भागात काँक्रीटीकरण करणे, सुरवडी खंडोबामाळ ते प्रांजमा १६ रस्ता ग्रा.मा.३१ चे प्र.जि.मा. १२ ते ग्रा.मा. १८ भागात काँक्रीटीकरण करणे, महाड पंढरपूर रस्ता ते बनकरवस्ती रस्ता ग्रा.मा.७७ चे महाड पंढरपूर रस्ता ते बनकर वस्ती भागात काँक्रीटीकरण करणे आणि ढवळ ते वाठार निंबाळकर फाटा ग्रा.मा. २५० रस्ता सुधारणा या कामांचाही यात समावेश आहे.

या सर्व रस्त्यांच्या कामांच्या जोडीला रा.मा - १४६ ते झडकवाईचीवाडी ते तरडफ वेलोशी रस्ता ग्रा.मा.२२१ ची झडकबाईची वाडी ते तरडफ ते वे लोशी ते एमडीआर-६७ भागात सुधारणा करणे, निरगुडी येथील लांडगेवस्ती रस्ता ग्रा.मा. २१० येथे ओढ्यावर पुल बांधणे आणि गुणवरे ते मठाचीवाडी रस्ता ग्रा.मा. १०८ भाग मठाचीवाडी गावाजवळील पुल बांधणे अशी एकूण ९३ कोटी ३५ लाख रुपयांची फलटण कोरेगाव मतदार संघातील अत्यावश्यक आणि महत्त्वपूर्ण कामे या अर्थसंकल्पातून मंजूर करण्यात आली आहेत. या भरीव निधीमुळे फलटण-कोरेगाव मतदारसंघातील मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तींचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे रस्ते व दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला