महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
राजेंद्र बोन्द्रे
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
- बातमी शेयर करा
फलटण : दरवर्षीप्रमाणे गुरुवार दिनांक 2 एप्रिल पासून फलटण येथील सुप्रसिद्ध घोड्याची यात्रा सुरू होऊन मंगळवार दिनांक 7 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस ही त्याची सांगता झाली. फलटण येथे असणाऱ्या आबासाहेब मंदिर येथील महास्थान येथे आमदार श्री सचिन पाटील यांच्या हस्ते पूजन होऊन या घोड्याच्या यात्रेच्या पालखीचे पूजन माननीय श्री नगराध्यक्ष समशेरशीय नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होऊन पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री तसेच विश्वस्त सुदामराज बाबा विद्वांस विश्वस्त बाळासाहेब ननवरे माजी नगरसेवक सुदामाप्पा मांढरे नगरसेवक संदीप चोरमले अशोक काका जाधव कुमारी सिद्धाली शहा माजी नगरसेवक अनुक्षा तसेच फलटण शहरातील इतर प्रतिष्ठित मान्यवर नागरिक मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.
परंपरेनुसार आणि मानाप्रमाणे मानकर यांनी पालखीला खांदा देऊ मानाच्या घोड्यांची मिरवणूक फलटण शहरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात संपन्न होऊन बानगंगा नदी तीरावर मानाच्या घोड्याला पंचामृताने स्नान घालण्यात आले.
या यात्रेसाठी महानुभाव पंथीयांचे महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तगण तसेच संपूर्ण भारतातील महानुभाव पंथी यांनी दरवर्षीप्रमाणे येथे आपली उपस्थिती दर्शवली.
यात्रेकरूंच्या उपस्थितीमुळे संपूर्ण फलटण शहर मोठ्या गर्दीने फुलून गेले होते.
फलटण शहरात मानभाव पंथीयांची एकूण सहा मंदिर असून श्री आबासाहेब श्रीरंग शिला श्री बाबासाहेब (श्रीकृष्ण नाथ ),श्री चक्रपाणि (जन्मस्थान) श्रीरंग शिळा, श्री दत्त मंदिर (मलठण) या सर्व सहा मंदिरामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातून तसेच परप्रांतातून आलेल्या महानुभाव पंथीय उपदेशी व अन्यभावी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. या यात्रेनिमित्त विशेषता देश परदेशातून आणि हरियाणा पंजाब मध्य प्रदेश दिल्ली, गुजरात उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि फलटण तालुक्यातून स्थानिक भाविक भक्त मोठ्या संख्येने यात्रेत दाखल झालेले दिसून येत होते.
आलेले सर्व भाविक भक्त फलटण येथील विविध मंदिरे आणि महानुभाव मठामध्ये वास्तव्यास राहत असतात. ही घोड्याची यात्रा बाबासाहेब मंदिर सुभाष चौक चावडी चौक बारस्कर चौक मारवाड पेठ या मार्गाने छबिना रात्री साडेनऊ पर्यंत आबासाहेब मंदिरात येत असतो तेथे आरती होऊन देवाचा छबिना समाप्त होतो.

सकाळी दहा वाजता मानकरी श्रीकृष्ण मंदिर म्हणजेच बाबासाहेब मंदिर येथून मानाचा घोडा वाजत गाजत डोक्यावर घेऊन बाणगंगा नदीपात्रात त्याला पंचामृतनाथ आणि स्नान घालून पुष्पर हार व दवणा अर्पण करून श्रीकृष्ण मंदिरात भाविकांना दर्शनास ठेवला जातो. दुपारी आरती झाल्यानंतर एक वाजता आमदार सचिन पाटील नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पूजन होऊन श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती पालखीत वीराजमान करण्यात येऊन मुख्य मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
श्री चक्रपाणी प्रभूंचा जन्म फलटण येथे शके 1043 अश्विन शुद्ध नवमी पुष्य नक्षत्रावर गुरुवारी प्रातःकाळी झाला ते प्रभूंचे जन्मस्थान मंदिर जन्मस्थळ फलटणच्या पश्चिम भागात शुक्रवार पेठेत आहे या भागाला बारस्कर गल्ली म्हणून ओळखले जाते इतिहासात हा भाग ब्रह्मपुरी म्हणून ओळखला जात होता बाणगंगा तीरावर असणारी ही पूर्वाभिमुख जागा असून त्यांच्या वडिलांचा वाडा तेथे होता आज या ठिकाणी अतिशय सुंदर मंदिर उभारले गेले आहे. या जन्मस्थळाच्या बाजूलाच श्रीकृष्णनाथाचे विशाल मंदिर प्राचीन पद्धतीने बांधण्यात आले आहे या मंदिरात बाबासाहेब मंदिर असे म्हटले जाते या मंदिरातील गर्भ ग्रहात असलेल्या श्रीकृष्ण मूर्तीची पूजा स्वतः श्री प्रभू करत होते ढवळगिरीच्या राजाने या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते.
अशा या महानुभाव पंथ्यांची दक्षिण काशी असणाऱ्या श्री शेत्र फलटणला राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.
श्री चक्र प्रभूंच्या लोककल्याणकारी अवताराने अकराव्या शतकापासून जातीयता वर्णावर्ण व्यवस्था भेदाभेद अंधश्रद्धा याची शिकवण ची सुरुवात केली श्री चक्रधर स्वामींनी अखिल मानव मात्राच्या उद्धारासाठी आपल्या संपूर्ण जीवनात महाराष्ट्राचे पायी परिभ्रमण करून हा जागर घडविला. समतेचा मूलमंत्र अहिंसा आणि व्यसनमुक्तीचा महामंत्र अतिशय शांततेने समाजाला शिकविला.
लोकशाहीतील तीन मूलतत्त्व स्वातंत्र्य बंधुता ममता यांचा उल्लेख स्वातंत्र्य हा मोक्ष तर पारतंत्र्य हा बंध. असे सांगून लोकशाहीच्या मूलतत्त्वांना प्रतिष्ठित करणारा हा महानुभाव संप्रदाय आध्यात्मिक उन्नयनासोबत सामाजिक जीवनाला प्रगत अवस्थेकडे नेणारा आणि नीतिमूल्यांचा आदर्श आचार शिकवणारा म्हणून या महानुभाव संप्रदायाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
अशा या महानुभाव पंथीयांच्या घोड्याच्या यात्रेच्या वेळी फलटण येथे मोठे भक्ती भावाचे वातावरण तयार झाले होते.
फलटण नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी उत्तम व्यवस्था या यात्रेची आणि यात्रेकरूंची ठेवली होती. फलटण शहरातील भाविक भक्तांनी छबिन्याच्या वेळी ची गर्दी पाहून पाणी सरबत थंडपेय भक्तांना कमी पडू नयेत म्हणून सर्व ठिकाणी भावभक्तीने पुरवठा करण्यात येत होता.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
संबंधित बातम्या
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 7th Apr 2026 06:32 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 7th Apr 2026 06:32 pm










