फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.
Satara News Team
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
- बातमी शेयर करा
फलटण: फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च 2026 रोजी होत असून या निवडणुकीसाठी असणारे निवडणूक निर्णय अधिकारी फलटणच्या उपविभागीय अधिकारी तथाप्रांत सौ प्रियांका आंबेकर यांच्या ऐवजी दुसरा निवडणूक निर्णय अधिकारी द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्याकडे दि. 10 मार्च 2020 रोजी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोळा सदस्यांच्या पैकी शिवसेना आठ आणि भाजप राष्ट्रवादी आठ असे समसमान संख्याबळ झाल्यामुळे सभापतीपदाची निवडणूक ही चिट्ठीद्वारे होणार की अजून काही नियमानुसार होणार अशी चर्चा फलटण तालुक्यात चालू असतानाच श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्याची मागणी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर शिवसेना च्या वतीने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख श्री चंद्रकांत दादा जाधव यांनी सातारा जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक श्री विराज खराडे यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे मागणी केली आहे की सभापती पदाची निवड ही सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत आणि संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्यात येऊन सभापती निवडीमध्ये पारदर्शकता असावी यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सौ. प्रियांका आंबेकर यांच्या ऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन ही सभापती पदाची निवड व्हावी अशी मागणी केली आहे.
या मागणीवर सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील आता काय निर्णय घेणार याकडे सर्व फलटण तालुक्याचे लक्ष वेधून राहिले आहे.
#phaltan#phaltannagrpalika#ramraje#eknathshinde#shamburaje
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
संबंधित बातम्या
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 11th Mar 2026 04:46 pm
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Wed 11th Mar 2026 04:46 pm










