फलटण : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच फलटण नगरपालिकेत आढावा बैठक पार पडली होती. त्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून पाहणी करण्यात आली.
या पाहणीमध्ये पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर, यांनी
या पाहणीमध्ये शहरातील जुना गावठाण परिसरातील शंकर मार्केट, शिवाजी रोड, दत्तनगर, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, मारवाड पेठ तसेच तेली गल्ली या भागांचा समावेश करण्यात आला. या भागांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती पाहून पाणीपुरवठ्याच्या अडचणींची माहिती घेण्यात आली.
फलटण शहरात जुन्या गावठाण भागात पाणीपुरवठ्यामध्ये काही अडचणी येत असल्याच्या निदर्शनास आल्यावर सुरळीत व सुनियोजित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या भागात पाहणी करण्यात आली शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा वेळेवर आणि नियोजित होण्याचे स्वप्न नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे असून ते पूर्ण करण्यासाठी नगरपालिका आता प्रत्यक्ष कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने सभापती राहुल निंबाळकर यांनी आज सायंकाळी ५ वाजता नगरपरिषदेत विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत जुना गावठाण परिसरातील प्रभाग क्रमांक ४, ८ आणि १२ मधील नागरिकांना योग्य दाबाने आणि वेळेत पाणीपुरवठा कसा करता येईल, पाणीपुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांच्या काही समस्या असतील याबाबत नागरिकांची मते जाणून घेत पाणीपुरवठा संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी नगरपरिषद स्तरावर ठोस पावले उचलली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
फलटण शहरातील नागरिकांच्या समस्या बाबत नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांचा नगरपालिका प्रशासनातील मागील काही वर्षांचा अनुभव पाहता नगराध्यक्ष व नगरसेवक नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या बाबत आता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. याबाबत फलटण शहरातील नागरिक प्रदीर्घ काळाच्या प्रशासकीय राजवटीनंतर समस्यांची सोडवणूक होत असल्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 10th Mar 2026 03:03 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 10th Mar 2026 03:03 pm













