औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.

औंध : औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात श्रीमंत चारूशीला राजे स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने औंध शिक्षण मंडळाच्या व्हाईस चेअरमन श्रीमंत चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी यांच्या वाढदिवसानिमित्त 'पदवीनंतरच्या करिअरच्या संधी' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.  कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुशील यादव, वाय. सी. कॉलेज, सातारा येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक होते. कार्यशाळेस संस्थेचे विश्वस्त हणमंतराव शिंदे,  राजेंद्र माने, सचिव मा. प्रदीप कणसे, सहसचिव संजय निकम व दीपक कर्पे, प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, सर्व विद्याशाखांचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. 


            प्रमुख मार्गदर्शक सुशील यादव यांनी एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., वनसेवा, पोलीस भरती इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुरुवातीपासूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बातम्या पाहणे, शॉर्ट लिखाण करणे त्याचबरोबर इतर विषयाची तयारी करण्याची त्यांनी सूचना केली. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हायस्कूलमध्ये शिकत असताना चालू घडामोडीसाठी बातम्या पाहणे, वर्तमानपत्रं वाचणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम समजून घेवून अभ्यासामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. प्रदीप कणसे सर होते. त्यांनी ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगन्नाथ ननवरे यांनी केले, प्रा. चोरगे पी.जे. यांनी सूत्रसंचालन व आभार प्रा. गजानन शिंदे यांनी मानले. कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला