फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
फलटण येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलिसात लेखी तक्रारराजेंद्र बोन्द्रे
- Fri 19th Sep 2025 10:16 am
- बातमी शेयर करा
फलटण ; फलटण शहरातील नाना पाटील चौक येथील पंढरपूर पुलाजवळ नीरा उजवा कालवा येथे गणेश मूर्तींचे दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी परंपरागत विसर्जन करण्यात आले; मात्र विसर्जनानंतर दोनच दिवसात कालव्याचे पाणी बंद केल्यामुळे गणेश मूर्ती उघड्या पडल्या; परंतु या गणेश मूर्ती पुन्हा विसर्जित करण्याविषयी फलटण नगरपरिषदेने कोणतेही उपायोजना केली नाही. उघड्या पडलेल्या गणेश मूर्तींची विटंबना झाली असून स्थानिक गणेश भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. गणेशोत्सवात दहा दिवस खूप मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने गणेश मूर्तींची पूजा आरचा केली जाते आणि परंपरेनुसार दहा दिवसानंतर विधिवत विसर्जन केले जाते. परंतु निरा उजवा कालवा इरिगेशन विभागाच्या वतीने लेखी पत्र देऊन सुद्धा फलटण नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने विचार न करता उघड्या पडलेल्या मूर्तीबाबत दहा दिवस होऊन गेले तरी पुनर्विसर्जनासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्यामुळे उघड्या पडलेल्या मूर्तींची विटंबना झाली हे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गणेश भक्तांच्या निदर्शनास आले. यामुळे संबंधितावर गणेश मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी लेखी तक्रार स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
यावेळी अधिवक्ता संदीप कांबळे, श्री संदीप कुमार जाधव भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे तालुका संयोजक अक्षय तावरे, मंगेश खंदारे, अक्षय शिंदे, गणेश घनवट, गोरक्षक श्रीकांत खटावकर, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, आशिष कापसे आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटण शहरातील नाना पाटील चौक येथील पंढरपूर पूला जवळ असणाऱ्या नीरा उजवा कालवा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. ६ सप्टेंबर या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर ८ सप्टेंबरला नीरा उजवा कालवा इरिगेशन विभागाच्या वतीने लेखी सूचना दिल्याप्रमाणे मुखाशी बंद करण्यात आला. यामुळे गणेश मूर्ती पाण्याबाहेर उघड्या पडून त्यांची विटंबना झाली. याविषयी जाब विचारण्यासाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नीरा उजवा कालवा विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता श्री मोरे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी तत्कालीन कार्यकारी अभियंता बोडखे यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच शहर पोलीस ठाणे अन् ग्रामीण पोलीस ठाणे यांना ८ सप्टेंबर या दिवशी पाणी बंद होणार आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यामध्ये होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनानंतर त्या उघड्या पडून त्यांची विटंबना होऊ शकते. तथापी फलटण नगरपरिषदेने कालव्यामध्ये विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती एकत्र करून पून्हा विसर्जन करण्याचे नियोजन करावे, अशा आशयाचे पत्र २५ ऑगस्ट या दिवशीच दिले होते, या पत्राची प्रत उपअभियंता श्री कोकरे यांनी कार्यालयात प्रत्यक्ष दाखवून नगरपरिषदेला देण्यात आली आहे असे सांगितले. यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी फलटण नगरपरिषदेत जाऊन फलटण नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर असल्यामुळे उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. यावेळी उपमुख्याधिकारी पाटील यांनी स्वच्छता निरीक्षक मुकेश अहिवळे यांच्यासह स्वतः घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाणी करून त्वरित पुनर्विसर्जनासाठी व्यवस्था करण्यास सांगितले. अहिवळे यांनी नीरा उजवा कालव्यामध्ये उघड्या अवस्थेत असलेल्या गणेश मूर्ती स्वतः इतर कर्मचाऱ्यांच्या सह पाहून उपमुख्याधिकारी तेजस पाटील. यांच्यासोबत चर्चा करून पुनर्विसर्जनासाठी विचारविनिमय केला, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात तक्रारअर्ज प्रविष्ट करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. या प्रकाराबाबत मात्र फक्त शहरातील गणेशभक्त नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे
फलटण शहरातील संपूर्ण विसर्जनात मात्र फलटण येथील महागणपती गणेशोत्सव मंडळ अहिल्यानगर संस्थापक अध्यक्ष श्री अमोल भैया निंबाळकर यांच्या गणेश मूर्ती लालबागचा राजाच्या प्रतिकृतीचे विसर्जनाबाबत सर्वांनी आदर्श घ्यावा अशी मागणी गणेश भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे कारण दरवर्षी दहा फुटापेक्षाही उंच असणारी ही गणेश मूर्ती कांबळेश्वर येथे निरा नदीमध्ये भिवाई देवीच्या डोहात विधीवत विसर्जित केली जाते. यामुळे नदीपात्रात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे मूर्तीची विटंबना होत नाही कारण नैसर्गिक स्तोत्रात मानांक कार्यपद्धतीनुसार हे मंडळ दरवर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन करत असते या मानांक कार्यपद्धतीचा सर्वांनी अवलंब करून तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या सूचनांचा विचार करून स्थानिक प्रशासन आणि गणेश भक्तांनी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जना बाबत तयार केलेली मानक कार्यपद्धतीनुसार करण्यात आलेल विसर्जन,अशा आदर्श विसर्जनाचा आदर्श घेऊन विसर्जन करावे अशी चर्चा सर्व गणेश भक्तांच्या मध्ये आढळून येत होती
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 19th Sep 2025 10:16 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 19th Sep 2025 10:16 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 19th Sep 2025 10:16 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 19th Sep 2025 10:16 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 19th Sep 2025 10:16 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 19th Sep 2025 10:16 am
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 19th Sep 2025 10:16 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 19th Sep 2025 10:16 am
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 19th Sep 2025 10:16 am
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 19th Sep 2025 10:16 am
-
प्रीतम कळसकर यांच्या वाढदिनी उद्या विविध उपक्रमांचे आयोजन
- Fri 19th Sep 2025 10:16 am









