सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
Satara News Team
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
- बातमी शेयर करा
सातारा : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
यावेळी पुढे बोलताना सोनू साबळे म्हणाले दूध दरवाढी साठी आंदोलन, दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध गोष्टी व आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले तर ऊसाच्या एफ आर पी साठी आंदोलन असेल एसटी कामगारांचे आंदोलने व सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसून आंदोलने करून भाजपला बळ देण्याचे काम आता पर्यंत भाऊंनी केलेली आहे. याची पोचपावती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपबरोबर खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे राजकारण-समाजकारण करीत आहेत. यामुळे खोत यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारवाढीत मंत्रिपद मिळावे अशी रयत क्रांती पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. रयत क्रांती पक्षाचे व रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत २०१४ साली कोणतीही अपेक्षा न करता भाजप व मित्र पक्षाबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. सध्या भाजप व मित्र पक्षाचे राज्यात व केंद्रात सरकार आहे. असे असलेतरी सदाभाऊ खोत हे गेल्या पाच वर्षांपासून लोकांभिमुख सर्व पदापासून वंचित आहेत. यामुळे कार्यकर्त्यांत मरगळ पसरली आहे. कार्यकर्त्यांत सर्वत्र निराशेची भावना आहे. सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार जास्तीत मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. यासाठी त्यांनी दोन-तीन महिने स्वतःची सर्व कामे बाजूला ठेऊन महायुतीच्या उमेदवारांचे काम केले आहे .यामुळे खोत यांचे योगदान नजरेआड करण्यासारखे नाही. तरी सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान द्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 14th Jun 2024 05:43 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 14th Jun 2024 05:43 pm












