नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
राजेंद्र बोंद्रे- Sat 11th Jul 2026 07:08 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्या नंतर नगर परिषदेच्या प्रत्येक कामकाजावर लक्ष केंद्रित केले. अनेक दिवसापासून नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्याकडे फलटण शहरातील नागरिकांकडून कर वसुली विभागाच्या कर भरणा विषयी अनेक तक्रारी येत होत्या याबाबत नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी चौकशी करून व काही नागरिकांना विश्वासात घेतले असता मागील अनेक वर्षांपासून सूर असलेला मोठा कर घोटाळा समोर आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फलटण नगर परिषदेत मागील अनेक वर्षापासून कर वसुली विभागातील अनेक कर्मचारी संगनमताने मोठया थकबाकी असणाऱ्या नागरिकांना विश्वासात घेऊन तुमची थकबाकी कमी करून थकबाकी भरलेले रक्कमेची पावती देतो असे सांगून त्याच्याकडून रोख स्वरुपात एकूण थकबाकी रकमेपैकी काही रक्कम स्वीकारत होती व ती नगर परिषदेच्या खात्यात भरणा न करता स्वतःच्या खिशात घालत असल्याची बाब समोर येत आहे.
त्यानंतर कर वसुली विभागातील सॉफ्टवेअर मध्ये नगर परिषदेच्या ऑपरेटर याला काही रक्कम देऊन लॉगिन करून सॉफ्टवेअर मध्ये काही फेरफार करत थकबाकी रक्कम जमा दाखवून थकबाकी रक्कम जमा असलेल्या पावत्या संबंधित नागरिकांना देत असल्याची माहिती समोर येत आहे.
अनेक वर्षापासून हा घोटाळा अनेक कर्मचारी यांच्याकडून सुरू होता याबाबत नागरी सुविधा केंद्रातील लिपीक महिला कर्मचारी यांना दबाव टाकत महानेट सॉफ्टवेअर चा लॉगिन आयडी व पासवर्ड मागण्यात आला असता त्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड देण्यास नकार दिला असता त्यांना धमकी व शिवीगाळ करण्यात आली होती.
नगरपरिषदेच्या वसुली विभागात नागरिकांकडून कर गोळा करून तो स्वतःच्या खिशात घालण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मोठा भ्रष्टाचार नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पुराव्यानिशी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी गठीत केलेल्या चौकशी समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी करप्रणालीच्या सॉफ्टवेअरमधून पावत्या डिलीट करून पैसे लाटल्याची धक्कादायक लेखी कबुली दिली आहे.
नगरपरिषदेच्या वसुली विभागातील काही कर्मचारी नागरिकांकडून मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम रोख स्वरूपात जमा करून घेत होते. मात्र, ही रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात जमा न करता ते स्वतःच्या खिशात घालत होते.
या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी लेखी जबाब दिले आहेत. एका जबाबात मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी, भाडेकरूंची नोंद कमी करणे आणि मूल्यांकनाची कामे करण्यासाठी ५०० ते २००० रुपयांपर्यंत लाच घेतल्याचे एका कर्मचाऱ्याने मान्य केले आहे. तर दुसऱ्या एका जबाबात, नगरपरिषदेच्या 'महानेट' (MahaNet) सॉफ्टवेअरचा गैरवापर करून पावत्या डिलीट करणे आणि रोख रकमेचा अपहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात अनेक कर्मचाऱ्यांची नावेही उघड झाली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून फलटण नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनली होती. मात्र, फलटणच्या जनतेच्या घामाचा पैसा शहराच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतली आहे. या प्रकरणात जे कर्मचारी दोषी आढळतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,
"नागरिकाच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. नगराध्यक्षांनी गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून संशयित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू असून, यातील सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल." असा स्पष्ट इशारा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
#phaltannews
स्थानिक बातम्या
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sat 11th Jul 2026 07:08 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 11th Jul 2026 07:08 pm













