हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
Satara News Team
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
- बातमी शेयर करा
मेढा : जावळी तालुक्यातील हातगेवर विकास सेवा सोसायटीमध्ये कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत तीन सदस्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा पोलीस ठाणे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूक, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार श्री. वसंतराव ज्ञानदेव माणकुमरे, सौ. जयश्री वसंतराव माणकुमरे आणि श्री. स्वप्नील वसंतराव माणकुमरे (रा. कावडी, ता. जावळी, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२४ मध्ये त्यांनी ₹३ लाखांच्या कर्जासाठी हातगेवर विकास सेवा सोसायटीकडे अर्ज केला होता. मात्र, कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, त्यांच्या नावावर कर्ज मंजूर झाल्याचे दाखवून मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचे संदेश पाठविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात संपूर्ण कर्जरक्कम लाभार्थ्यांना मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, खोटी कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडून सह्या घेण्यात आल्या आणि कर्जाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सोसायटीचे चेअरमन भिमराव गुजर (रा. पानस) आणि सेक्रेटरी नारायण मारुती पाटे यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदस्यांचा विश्वासघात करून बोगस कर्ज प्रकरणे तयार केली, निधी वळविला आणि खोटी नोंदी तयार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, याबाबत विचारणा केल्यावर “आमचे काहीही चुकलेले नाही” असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तक्रारीत भारतीय न्याय संहिता (BNS) मधील फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Sat 18th Jul 2026 05:47 pm
-
महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!
- Sat 18th Jul 2026 05:47 pm












