वाढदिवस साजरा न करण्याचा पुरुषोत्तम जाधव यांचा निर्णय

खंडाळा : काही दिवसापूर्वी झालेल्या पितृशोकामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी वाढदिनी मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन सातारा जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार आहेत.


सामाजिक राजकीय, क्षेत्रातील हितचिंतक, शिवसेना पक्षातील सहकाऱ्यांनी यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. पुष्पगुच्छ भेटवस्तू आदी गोष्टींवरील खर्च टाळून या पैशातून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रमांना, गोरगरीब गरजूंना मदत करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


आज दि. ३० रोजी वाई तालुक्यातील यशोधन अनाथालय सोळशी रोड वेळे या ठिकाणी उपस्थित राहून या आश्रमातील 1 अनाथांबरोबर भेटवस्तूंचे वाटप व स्नेहभोजन करत त्यांना वेळ देणार आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी पुरुषोत्तम जाधव यांच्या वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र पुरुषोत्तम जाधव यांचे वडील ह. भ. प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. या दुःखातून सर्वांच्या प्रेमाने आम्ही सर्व कुटुंबीय सावरत आहोत. त्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पुरुषोत्तम जाधव यांनी घेतला आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त