हुतात्म्यांच्या भूमीत स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिवीरांना अभिवादन
कोमल वाघ-पवार - Fri 18th Aug 2023 03:40 pm
- बातमी शेयर करा
खटाव: सातारा जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक व वैभवशाली वारसा लाभलेला आहे. 1857 च्या उठावापासून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान बहुमोलचे आहे . वडूज हुतात्मा भूमीत क्रांतिवीर , स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांना अभिवादन करून क्रांतिकार्यास उजाळा देण्यात आला.
ऑगस्ट क्रांती चळवळीतील गौरवशाली पर्व म्हणजे सातारा प्रतिसरकार सातारा प्रतिसरकारचा लढा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढला. ब्रिटिशांना भारत सोडवायचा भाग पाडले आणि लोककल्याणाचे संवर्धन करणे ,याकरिता तुफान सेना, राष्ट्रसेवा दल ,बहिर्जी पथक, न्याय मंडळ अशाप्रकारे ग्रामराज्य निर्मितीचे कार्य केले. 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईतील काँग्रेसचे अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जाव चा नारा दिला. महात्मा गांधीजींच्या सूचनेनुसार ब्रिटिश सरकारच्या विरोधात चलेजाव लढा देशभर लढला. हिंदुस्थानात अनेक क्रांतिकारकांनी ,स्वातंत्र सैनिकांनी सत्याग्रह ,प्रभात फेरी ,मोर्चे या अनुषंगाने विविध पद्धतीने ब्रिटिश सरकारला भारत सोडून जाण्यासाठी भाग पाडणे . सातारा जिल्ह्यातील वडूज तहसील कचेरी वर 9 सप्टेंबर 1942 रोजी परशुराम घारगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रज अधिकारी बिंडी गिरी व मामलेदार अंकली यांनी या मोर्चातील सत्याग्रह करणाऱ्या लोकांवरती गोळीबार करण्याचा आदेश दिला.यामध्ये नऊ सत्याग्रहींनी हौतात्म्य पत्करले या तेजस्वी व प्रेरणादायी क्रांती पर्व निर्माण करणाऱ्या क्रांतिवीरांचा नव्या पिढीला जवळून परिचय व्हावा या उद्देशाने सुजन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने क्रांती अभियान उपक्रम राबविला .
हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्राथमिक शिक्षक बँक सातारा माजी चेअरमन नवनाथ जाधव , रविशास्त्री जाधव , सौ संध्या पाटील अध्यक्ष कादंबिनी फौंडेशन कराड, शबाना पठाण अध्यक्ष सुवर्ण परीस स्पर्श फौंडेशन , युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे सांगवी , मिलिंदा पवार प्रेरणा महिला मंडळ, व वडूज ग्रामस्थ उपस्थित होते.
खटाव तालुक्याची भूमीमध्ये देश राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन स्वातंत्र्य संग्रामचा लढा लढविला आहे. स्वातंत्र्य उत्तर काळात कृषी, सहकार, प्रशासकीय सेवा ,उद्योग व व्यापार क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणारी पिढी निर्माण झाली. क्रांती अभियान उपक्रमामध्ये वडूज येथील आरोग्यासाठी कार्यरत डॉ.एन बी बनसोडे , पत्रकार मिलिंदा पवार ,औंध येथील सई यादव आर आर पाटील स्पोर्ट क्लब महिला फुटबॉल खेळाडू , पुसेगाव येथील सौ हेमलताआई फडतरे यांनी जयहिंद फौंडेशन खटाव तालुका टीमच्या माध्यमातून केलेले माजी सैनिकांचे कार्य उल्लेखनीय आहे.बुध येथील स्वातंत्र्य सैनिक संभाजीराव इंगळे सरदार यांच्या कार्याचा वारसा त्यांचे वारसदार जीवन इंगळे सर्वोदय संस्थेच्या माध्यमातून राबवित आहे . याप्रसंगी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकार्याला उजाळा देण्यात आला.तसेच कृतिशील कार्याबद्दल कृतज्ञात व्यक्त करून सन्मानित करण्यात आले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 18th Aug 2023 03:40 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 18th Aug 2023 03:40 pm









