आरफळ येथे नव्याने झालेल्या रस्त्याच्या साईड पट्टीचे काय ?

शिवथर. : आरफळ ता.सातारा येथील नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्या भरल्या नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्या वेळेत नाही भरल्या तर कोट्यावधी रुपये खर्च केलेला रस्ता खचला जाण्याची शक्यता आहे कारण की दोन्ही बाजूला पूर्णतः काळ्या मातीची जमीन असल्याने धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे वेळेतच मुरमाने  भरण्याची व्यवस्था ठेकेदाराने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
            आरफळ येथे कमानीपासून गावापर्यंत आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून एक कोटीच्या आसपास काँक्रीट करून रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे परंतु संबंधित ठेकेदार याच्याकडून साईड पट्टी भरण्याचे काम राहिले असून ते वेळेत पूर्ण व्हावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे सदर साईडपट्टी जर वेळेत भरली नाही तर कोट्यावधी रुपये खर्च केलेला रस्ता खचला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित ठेकेदाराने  साईड पट्टीचे काम चांगल्या दर्जाचे करावं कारण की दोन्ही बाजूला काळ्या मातीची जमीन असल्याने साईडपट्टीचे काम करताना रोलर चा वापर करणे अपेक्षित आहे असेही मत ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. तरी लवकरात लवकर साईडपट्टी भरून घेण्याचे काम ठेकेदारांन करावं अशी ग्रामस्थांमधून मागणी केली जात आहे.


रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टी चे काम करत असताना इस्टिमेट मध्ये ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्याच पद्धतीने होण गरजेचं आहे. त्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी सतर्कता बाळगली पाहिजे असेही सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त