भोळेवाडी धोकादायक वळणावर कार चालकाचा सुटला ताबा अपघातात युवक ठार

उंब्रज प्रतिनिधी:-पाटण पंढरपूर राज्य मार्गावर भोळेवाडी फाटा ता.कराड गावच्या हद्दीतील वळणावर स्विफ्ट कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने 
  कार रोड कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली यामध्ये  गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु  झाला. सदरचा अपघात शनिवारी रात्री  ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. 
      सुरज जालिंदर कुंभार वय ३२ रा.उंब्रज ता.कराड असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण पंढरपूर राज्य मार्गावर पाटण वरून उंब्रज दिशेला येणारी स्वीफ्ट कार क्रमांक एम एच ०१ सीडी ७८८६ ही भोळेवाडी फाटा येथे आली असता या फाट्यावरील वळणावर कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने कार राज्य मार्गाच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात  कार चालक सुरज कुंभार हा गंभीर रित्या जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी अपघातग्रस्त युवकास उपचारासाठी तातडीने कराड येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  झाला.
   अपघाताची नोंद उंब्रज पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलिस हवालदार पवार करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला