अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,

एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

अहमदाबाद : अपघातामुळे देश हळहळला आहे. दुपारी बोईंग एआय - १७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचे इंजिन फेल झाले. पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, परंतू विमान एवढ्या कमी उंचीवर होते की पायलटही काही करू शकले नाहीत आणि विमान झाडांवर आदळले व मोठा अपघात झाला.

 विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. इमारतींच्या परिसरातील वाहने जळून खाक झाली आहेत. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. विमानाचा पाठीमागचा भाग खाली झुकल्याने तो झाडांवर आणि नंतर इमारतीच्या छतावर आदळला. यामुळे विमानाला आग लागली. अद्याप ब्लॅक बॉक्स मिळालला नाहीय. त्यावरून नेमका अपघात कसा झाला आणि त्याचे कारण काय याची माहिती मिळणार आहे. अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता निघालेले हे विमान बोईंग ७८७-८ विमान होते ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. 

अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला