पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
आशपाक बागवान.
- Sat 14th Jun 2025 09:40 am
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : पुसेसावळी ग्रामपंचायत हद्दीतील विटा रस्त्यावर एम.एस.ई.बी.च्या कार्यालया शेजारील पाटबंधारे विभागाच्या विना वापर बंद अवस्थेत असलेल्या खोल्यांपैकी एका खोलीत पुसेसावळी येथील २० वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी सह परिसरातील युवक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी माहिती मिळताच औंध पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पुसेसावळी दुरक्षेत्राच्या महिला पोलिस हवालदार खाडे, पोलिस हवालदार कांबळे आणि पोलिस हवालदार रोहित खरात यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत जागेवर पंचनामा करण्यात आला.
यानंतर सदरचे मृतदेह ग्रामीण रूग्णालय,औंध येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले नंतर त्याचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
याबाबत दिलीप गोविंद जाधव, यांनी १३ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता चे पुर्वी (नक्की वेळ माहीत नाही) मौजे पुसेसावळी ता. खटाव गावचे हद्दीत एम.एस.ई.बी. ऑफिस शेजारील पडक्या खोलीत पुतण्या शुभम सुरेश जाधव वय-१९ वर्षे रा.पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा हा दोरीने गळफास घेऊन मयत अवस्थेतेत मिळुन आला आहे. तरी त्याचे मयतेचा तपास व्हावा. अशी खबर दिली असून त्यानुसार औंध पोलिस स्टेशन येथे अकस्मात मयत नंबर ३४/२०२५ ने नोंद घेतली असून त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल एस.वाघ करीत आहेत.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sat 14th Jun 2025 09:40 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sat 14th Jun 2025 09:40 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sat 14th Jun 2025 09:40 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sat 14th Jun 2025 09:40 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 14th Jun 2025 09:40 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sat 14th Jun 2025 09:40 am
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Sat 14th Jun 2025 09:40 am













