BRAKING :शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार ...शौचालय घोटाळ्याप्रकरणी ‘APMC’ संचालक संजय पानसरेंना अटक

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : ‘एपीएमसी’मधील शौचालय घोटाळा प्रकरणी पोलिसांनी संचालक संजय पानसरेंना अटक केली आहे. साडेसात कोटींच्या शौचालय ठेका घोटाळ्यात त्यांचेही नाव चर्चेत होते. पानसरेंच्या अटकेनंतर बाजार समितीचे संचालक असलेले सातारा लोकसभा  मतदासंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले आ. शशिकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.

एपीएमसी आवारातील शौचालयाच्या ठेक्यात साडेसात कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवून या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीअंती त्यांनाही अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंतची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

इतर संचालकही येणार अडचणीत?
या प्रकरणात सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवीत असलेले बाजार समितीचे संचालक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ आणि इतर अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत इतरांनाही अटकेची सूत्रे हलणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संस्थेशी आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय
संजय पानसरे यांनी निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ हजार रुपये इतके असताना ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त