ओंकार चव्हाण खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

वाई : दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत  ओंकार चव्हाण यास जीवे ठार मारुन त्याची बॉडी भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. 
सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित आरोपी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव सह एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली होती. 


सदर प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( MCOCA ) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये अटक असलेला १३ नंबर चा आरोपी शुभम जाधव याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जदार / संशयित आरोपी शुभम जाधव हा घटनास्थळी हजर असल्याबाबत तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांस मारहाण केल्या बाबत आरोप त्याच्यावर होते. सदर आरोपीस तपासादरम्यान झालेल्या ओळखपरेड (TIP) मध्ये संशयित आरोपी शुभम जाधव साक्षीदारांनी ओळखले नसून कोणतेही सुसंगत पुरावे आरोपीच्या विरोधात नाहीत , तसेच FIR मध्ये देखील अर्जदार शुभम याचे नाव नाही असा युक्तिवाद संशयित आरोपी / अर्जदार शुभम च्यावतीने करण्यात आला.


आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने काही अटी व शर्तींवर आरोपीस जामीन मंजूर केला असून संशयित आरोपीच्या वतीने ॲड. शैलेश धनंजय चव्हाण , ॲड. प्रथमेश अनिल बनकर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त