वाईट विचारांवर वाढलेलं काँग्रेस मुळा सकट उपटू... संदीपभाऊ शिंदे

सातारा  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी, त्यांना इतर प्रगत समाजाच्या तुलनेत सामाजिक समानता मिळण्यासाठी, आरक्षण लागू केले. हे आरक्षण सत्तेत आल्यावर रद्द करू अशी वल्गना करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातून मुळासकट उपटून काढू. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय समाजाची ताकत काय आहे हे दाखऊन देऊ असा इशारा समस्त दलीत बांधवांच्या वतीने मा.जि.प.सदस्य संदिपभाऊ शिंदे यांनी दिला.
        अमेरिका दौऱ्यावर असताना वॉशिंग्टन मधील जॉर्ज टाऊन विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना आरक्षणाच्या विरोधात खा.राहुल गांधी यांनी गरळ ओखली यावेळी त्यांनी भारतामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही मागासवर्गीयांचे हे आरक्षण रद्द करू अशी घोषणा केली आणि त्याचीच री ओढत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्ताव्याच्या आज बहुजन विचारवादी संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव तहसील कार्यालयावर मागासवर्गीय समाजाचा मोर्चा काढण्यात आला यावेळी संदीपभाऊ शिंदे बोलत होते.


याप्रसंगी कोरेगाव मा. उपनगराध्यक्ष जयवंत पवार, भा.ज.पा ज्येष्ठ नेते बबनराव कांबळे, जि.प.सदस्य मधुताई कांबळे, मा.प.स सदस्य रविंद्र बोतालजी,कांतीलाल कांबळे,गणेश यवले, राजेंद्र वैराट, विलासराव रणखांबे, संजय दुबळे, सौ सुनीता जाधव, सौ वनिता जाधव, रंजीत कसबे, यांची प्रमुख उपस्थिती होती.


         बोलताना यापुढे संदीपभाऊ म्हणाले मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचवण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आरक्षण लागू केले. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे आता कुठे मागासवर्गीय समाजाला इतर समाजाच्या बरोबरीने समाजात वावरण्याची,राहण्याची,शिकण्याची संधी मिळत आहे. परंतु अजूनही ती १००% पूर्ण झालेली नाही, त्यामुळे मागासवर्गीयांचे सामाजिक राजकीय आरक्षण यापुढे सुरू राहणे गरजेचे आहे. काँग्रेसने भोगलेल्या साठ-सत्तर वर्षाच्या सत्ताकाळात मागासवर्गीय समाजाच्या जीवावर राजकारण केले आणि आत्ता जेव्हा सत्ता गेली त्यावेळी त्यांनी आरक्षण विरोधी आपला खरा चेहरा समोर आणला आहे. जोपर्यंत त्यांची सत्ता होती तोपर्यंत त्यांना आरक्षणाप्रती प्रेम वाटत होते, आता सत्ता गेली आणि भविष्यात सत्ता येणार नाही याची भीती वाटत असल्याने आता त्यांनी आरक्षण विरोधी भूमिका पुढे आणली आहे. त्याचाच परिपाक म्हणून खा.राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये आरक्षण विरोधी वक्तव्य केले. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही आरक्षण रद्द करू, अशी घोषणा केली. त्याचीच री ओढून काँग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणूगोपाल यांनी देखील आरक्षणाबाबत आपल्या अकलेचे तारे उरले तोडले आम्ही या वृत्तीचा जाहीर निषेध करतो. भा.ज.पा. ची सत्ता जेव्हापासून या देशात आली तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. जीवात जीव असेपर्यंत मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे अभिवचन दिले आहे. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी कोणाचा बाप आला तरी आरक्षण बदलू शकत नाही. असे खडे बोल सुनावून मागासवर्गीयांना मोठा आधार दिला आहे. मात्र काँग्रेसने अशीच भूमिका भविष्यात ठेवली तर वाढलेलं काँग्रेस मुळासकट उपटून काढू असे शेवटी संदीपभाऊ शिंदे म्हणाले.
         याप्रसंगी मा. जि.प. सदस्या मधुताई कांबळे यांनी काँग्रेसच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.


           सकाळी ११ वा. छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हुतात्मा स्मारकापासून निषेध मोर्चास सुरुवात झाली तो पुढे सखळी पुला मार्गे तहसील कार्यालय कोरेगाव येथे गेला या मोर्चामध्ये समाज बांधवांनी अनेक निषेधाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला मोर्चा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तेथे आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले व तेथेच मोर्चाची सांगता झाली..
         या मोर्चात राजन येवले, गणेश येवले, धीरज सरगडे, प्रदीप बोतलाजी,विनोद बोतलजी,अर्जुन आवटे, सौ दिपाली चव्हाण, नरेश बोकेफोडे, सुमित देंडे, गौरव खवळे, गोविंद देंडे,अर्जुन आवटे आधी प्रमुख पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त