उप अभियंता विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास चार हजारांची लाच मागितल्याने गुन्हा दाखल

सातारा : सातारा येथील सदर बझार मधील उप अभियंता विभागाच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोजकुमार दशरथ माने (वय ४७, रा. संभाजीनगर, सातारा) याने नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड, ता. कोरेगाव येथील म्हाडा वसाहतीत असणारा प्लॉट विकायचा आहे. त्यासाठी नाहरकत पत्र देण्यासाठी वरिष्ठ लिपिक मनोज माने याने तक्रार दाराकडे 7 हजारांची मागणी केली मात्र, तडजोडी अंती 4 हजाराची लाच स्वीकारन्याची मने याने संमती दर्शवली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लिपिक मनोजकुमार माने याच्यावर शनिवारी दुपारी सातारा शहर पोलिस ठाण्यात लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.


पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक़ सचिन राऊत, पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार गणेश ताटे, पोलिस नाईक नीलेश चव्हाण यांनी या कारवाई सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त