९ जुलै सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; मुसळधारचा इशारा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने ९ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. तरीही अजुन पश्चिम भागात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतही कमी पाणीसाठा आहे. अशातच हवामान विभागाने दि. ८ आणि ९ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विशेषता करुन जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाट क्षेत्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पश्चिम भागात दरडी कोसळतात, झाडे पडतात. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त