जावळीच्या राजधानीत धडाडणार मराठ्यांचा एल्गार मेढ्यात मनोज जरांगे- पाटील यांचा एल्गार

शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेढ्यात एल्गार

कुडाळ  : छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शौर्याने प्रसिध्द असलेल्या जावली तालुक्याची राजधानी ऐतिहासिक मेढा नगरीत शनिवार दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जावली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे, व अन्न-पाण्याचा त्याग करणारे, मराठा समाजाचा ढाण्यावाघ मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार असून या सभेला मराठा बांधवांनी शेतातील कामे लवकर उरकुन आपला एक दिवस मराठा समाजासाठी द्यावा व लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज जावळी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त