सातारा जिल्ह्यात हजरत मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त 'दुवा फतेहा'
- Satara News Team
- Sun 9th Oct 2022 07:53 am
- बातमी शेयर करा
सातारा : कोणताही धर्म व धम्म हा मानवाच्या कल्याणासाठीच स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वधर्मीय संस्थापक हे आदरणीय आहेत. याची प्रचिती खटाव तालुक्यात तसेच हुतात्मा नगरी असलेल्या वडूज मध्ये पाहण्यास मिळाली.विविध ठिकाणी हजरत मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त 'दुवा फतेहा' साजरा करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, जावळी, मेढा, कुडाळ माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी व इतर गावात तसेच खटाव तालुक्यातील पुसेगाव, खातगुण, तडवळे, वर्धनगड, कातर खटाव, खटाव, पुसेसावळी,औंध,मायणी, डिस्कळ, गोपूज, निमसोड, निढळ,मांडवे, कुमठे, नांदोशी, हिंगणे, डाळमोडी,एनकुळ आदी गावात ईद- ए- मिलाद साजरी करण्यात आली.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध गावात मशीदीत नमाज अदा केली.वडूज मुस्लिम जमात यांच्याकडून बिरादरी, बागवान ,पठाण, शिकलगार, मुल्ला, शेख, डांगे, नदाफ, पिंजारी, आत्तार ,माणेर, काजी, सय्यद व मान्यवरांनी वडूज येथील मशीद येथून बाजार प्रांगणात जुलूस काढण्यात आला.त्यानंतर बदाम, काजू मिश्रित दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ महेश गुरव, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले,रा स प चे श्रीकांत देवकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव, सुनिल मिसाळ,दत्ता केंगारे,डॉ वैभव माने, आप्पासाहेब गोडसे, सौ राणी विकास काळे व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आदरणीय इस्लाम धर्म संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर हे वयाच्या ४० व्यावर्षी प्रेषित्व प्राप्त झाले. तथापि,लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू होता. लहानपणीच आई-वडिलांची छत्रछाया हरवली. आजोबा व चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांच्यासोबत त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने प्रवास व भटकंती केली. त्यांनी
तरुणपणीच आपल्या नैतिक चारित्र्य व आचरणाने 'अलअमिन' (विश्वासू) म्हणून सन्मान प्राप्त केला होता. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता व अभ्यासूवृत्ती होती.त्यांचे मन समाजाप्रती दया आणि करुणेने ओतप्रोत भरलेले होते. 'हिरा'डोंगराच्या गुफेमध्ये ते चिंतन करीत होते. दिव्य ज्ञानाच्या स्फुल्लिंगाने एक निश्चित ध्येयासाठी हजरत मुहम्मद पैगंबराच्या कार्याला सुरुवात झाली. सच्चा, प्रामाणिक व कर्तव्य
निर्धाराने सत्य, न्याय व नीतीच्या दीन (धर्म)
इस्लामची प्रतिष्ठापना त्यांनी केली. आज जगभर इस्लाम धर्म अनेकांनी स्वीकारला आहे.त्याची ही माहिती जाणकार मंडळींनी दिली.आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी फळ व सरबत व दुध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
खटाव तालुक्यात ईद ए मिलाद निमित्त दुधाचे मोफत वाटप करताना मान्यवर( छाया-निनाद जगताप,सातारा)
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sun 9th Oct 2022 07:53 am
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sun 9th Oct 2022 07:53 am
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Sun 9th Oct 2022 07:53 am
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Sun 9th Oct 2022 07:53 am
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Sun 9th Oct 2022 07:53 am
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sun 9th Oct 2022 07:53 am
संबंधित बातम्या
-
मसूर येथे योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
ग्रामीण नाट्य संस्कृती जपण्यासाठी ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा पुढाकार
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय आ. शिवेंद्रराजे
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
मनोजदादा हे सख्खे भाऊ तर तुतारीवाले सावत्र भाऊ
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
आकाश तात्या साबळे यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
सचिवांवरचे बिनबुडाचे आरोप टाळावेत : माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल मुलाणी
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
- Sun 9th Oct 2022 07:53 am
-
शकुंतलेश्वर मंदिर वडूथ येथे शानदार दीपोत्सव २०२४ दिमाखात साजरा
- Sun 9th Oct 2022 07:53 am