आंबेनळी घाटात तब्बल 8 फूट लांबीचे अजगर

प्रतापगड : सह्याद्रीच्या खोर्‍यातील महाबळेश्वर व प्रतापगड परिसरातील घनदाट जंगलातील जैवविविधता ही निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच असते. या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्राणी, सर्प आढळतात. नुकताच या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तब्बल 8 फूट लांबीचे अजगर प्रवाशांना आढळून आला आहे. रस्ता ओलांडताना प्रवाशांना गाडीच्या प्रकाशात पाहायला मिळाला.
मंगळवारी रात्री प्रतापगडहून परत येत असताना महाबळेश्वरमधील काही स्थानिकांना रस्ता ओलांडत असणारा तब्बल 8 फुटाच्या अजगराचे दर्शन झाले. एवढे मोठे अजगर पाहिल्यानंतर प्रवाशी घाबरले मात्र अजगर मंदगतीने रस्ता ओलांडत होते. लाईटच्या झोतामुळे अजगर खूप एकाच जागी थांबले होते. त्यामुळे अजगराने रस्ता ओलांडेपर्यंत प्रवाशांना बराच वेळ वाटही पहावी लागली. मात्र एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होत प्रवाशांनी हा थरार अनुभवला.
सह्याद्री पर्वत रागांचाच एक भाग असल्याने या रांगाचा महाबळेश्वर तालुक्यात बराच मोठा भाग हा जंगलांनी वेढला आहे. बरेच वन्य जीव या भागात आढळत असतात. महाबळेश्वर येथे सापांच्या बर्‍याच प्रजाती आढळून येत असून बिनविषारी सापामधील सर्वात मोठी प्रजाती म्हणजे भारतीय अजगर हे होय

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त