शिवसेना पक्षाच्या वादळात जावळीतील झाडे स्तब्ध...

In the storm of Shiv Sena party, the trees in Jawli are stunned...

जावळी :  महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सक्षम असणार्‍या ठाणेस्थित पण मुळ जावळीची जन्मभूमि लाभलेल्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने राज्याच्या सत्ता बदलात जावलीसह महाबळेश्वरला मुख्यमंत्री लाभल्याचे अंतर्मुख शिंदे गटाचे शिवसैनिक खुश असले तरी मूळ शिवसेनेचे शिवसैनिक मात्र स्थिर असल्याचे चित्र जावली महाबळेश्वर तालुक्यातील असून शिवसेनेच्या गटबाजीच्या वादळात शिवसेनेची झाडे स्तब्ध आहेत याठिकाणी पान ही हालले नसल्याचे बोलले जात आहे. जावळीच्या शिवसेनेच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माज़ी आमदार सदाशिव (भाऊ) सपकाळ यांच्या पासून सुरू झालेल्या कारकीर्दीचा आढाव्या सोबत आज जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले एकनाथ ओंबळे यांच्या रूपाने भरीव कार्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथांच्या भेटीस ऐकटा एकनाथ जाणार का ? अशी जनमानसात चर्चा आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय इतिहास पाहता जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण,आनंदराव चव्हाण, प्रमिलाताई चव्हाण यांच्या लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी जावलीकरानी आपली ऐकी अनेकदा दाखवून दिली. त्याच वेळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या त्याच जावळी महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील 36 गावातील राजकीय इतिहासात 1995 साली जावलीकरांच्या एकजुटीने या जावली महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन आमदार गेनुजी गोविंद कदम यांचा पराभव करून मुंबईस्थित शिवसेना कार्यकर्ते असणार्‍या व वेळेप्रमाणे तालुक्याचे मुख्य ठिकाणी राजकारणात रस घेवून समाजसेवा करणार्‍या मुंबईत टॅक्सी वाहक असणार्‍या सदाशिव सपकाळ यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व जावली विधानसभा मतदार संघातून पहिले आमदार म्हणून निवडून आले.त्यांच्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या वरदहस्त असल्याने 
" न भूतो न भविष्यती "अशा पद्धतीने विकासगंगा जावळी तालुक्यातील विकासात्मक कार्यावर झाल्याने प्रत्येकाला सदाशिव सपकाळ आमदार असले तरी प्रत्येक शिवसैनिकाला मीच आमदार असल्याचे जाणवत होते.त्यावेळचे अधिकारी हेही सर्व गावागावातून विकासात्मक कामासाठी धडपडत होते. त्यातून शेकडो कोटींचा विकासात्मक पाया रोवून जावली तालुक्यातील विकासात्मक मतवर्तन पाहता जावली पंचायत समितीवर पाहिले सभापती म्हणून वसंतराव मांनकुमरे सह जिल्हा परिषदेच्या सभागृहात मच्छिंद्रनाथ क्षीरसागर, कै. विठ्ठलदादा पवार,कविता मोहन जगताप,कै.तानाजी धुमाळ यांच्या रूपाने 1997 ते पुढच्या कालावधीत शिवसेनेच्या रूपाने झंझावात निर्माण केला.या कालावधीत सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील खासदार म्हणून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यात आल्याची नोंद झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची घोडदौड आज ही या कालावधीतील विकास कामामुळेच असल्याचे मत सर्वसामान्य जनता करीत असून त्या नंतरच्या 10 /12 वर्षांच्या राजकीय कालावधीत अनेक राजकिय मुंबईस्थित समाजसेवी म्हणून आलेल्या राजकीय टोळीच्या माध्यमातुन आर्थिक निकषांवर निवडून असलेल्यांच्या यादीने खरे समाजहित जोपासणारे बाजूला जावून आर्थिक हितसंबंधांचे राजकीय राजकारण्यांनी ह्या मतदान संघावर आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसत आहे.शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद मिळालेल्या या शिवसेनेच्या मातब्बर लढवय्या नेते मंडळी यांच्या पुढे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्यापुढे
धनाढ्य राजकीय वरदहस्त लाभलेल्या  मतदार संघात शिवसेनेतील फुटीरतावादी लोकांच्या एकांगी स्वभावधर्मातून शिवसेनेची वाताहात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र मूळ शिवसैनिक यांनी " ऐकला चलो रे " प्रमाणे आपल्या शिवसेनेचाच भगवा हाती घेवून सोसायटीच्या व ग्रामपंचायतीच्या पासून नगर पंचायत पर्यंत मजल करीत मुळ शिवसेनेचे अस्तित्वात भर पाडण्याचे प्रयत्न केले.
मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्री मंडळातील एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तालुक्यातील विकासात्मक कार्यातून अनेक जणांना कामे करण्याची संधी मिळाली असली तरी मूळ शिवसेनेचे असणारे कार्यकर्त्यांनी मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या  शिवसेनातच राहण्यास पसंती व्यक्त केली असून महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी हे शिंदेंना पाठींबा देत असले तरी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या जावली महाबळेश्वर या मायभूमितील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंच्या एकला चलोच्या भूमिकेत दिसणे पसंत करीत असले तरी एकीकडे एकनाथ ओंबळे हे  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील व एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जावलीकर  म्हणून शिंदे गटात सामिल होण्यासाठी  
प्रयत्नशील असल्याचे निवडक शिवसेनेचे कार्यकर्ते बोलत असले तरी 
आम्ही उद्धव ठाकरे निष्ठ शिवसैनिक असल्याचे सांगितले जात असून मुख्यमंत्री एकनाथांच्या भेटीला ऐकटा एकनाथ जाणार असल्याची चर्चा  जावली महाबळेश्वर मध्ये होत असली तरी मूळ शिवसेनेचा शिवसैनिक हा मूळ सेने सोबतच आहे. 

मुळ बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली   जावली तालुक्यातील मुंबईत दगडू दादा सपकाळ यांच्या रूपाने लालबाग याठिकाणी व मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत जावळीतील मुंबईस्थित लोकांना आमदार व नगरसेवक पदे दिली ती आम्ही कधीच विसरणार नसून तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन अनेक जणांना शिवसेनेचे माध्यम लाभले छत्रपतींच्या जावली कधीच गधारी शिवसैनिक करणार नसून ते कायमस्वरूपी उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा पाठपुरावा करतील                   सचिन अशोक जवळ   मे   ढ़ा शहर शिवसेना प्रमुख

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला